सैराट स्टाईलने बहिण आणि पतीची हत्या; न्यायालयाने दिली भावांना जन्मठेपेची शिक्षा

Kolhapur Crime | मेघा पाटीलने 2015 मध्ये आपल्या प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) केला होता.
Kolhapur  Crime |
Kolhapur Crime |

Kolhapur Crime | पन्हाळा : कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या बहीण आणि तिच्या पतीची दोन सख्ख्या भावांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आला होता. सैराट चित्रपटातील कहाणीप्रमाणे या दोघांनीही बहिण आणि तिच्या पतीची हत्या केली होती. या दोन सख्ख्या भावांना कोल्हापुर न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पन्हाळा तालुक्यातील मेघा पाटीलने 2015 मध्ये आपल्या प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) केला होता. त्यांच्या या लग्नाला तिच्या कुटुंबीयांचाही विरोध होता. लग्नानंतर कसबा बावड याठिकाणी राहणाऱ्या मेघा आणि तिच्या पतीची तिच्या सख्ख्या भावांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सख्ख्या भावांना कोल्हापुर न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गणेश पाटील आणि जयदीप पाटील अशी या दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. तर तिसऱ्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने त्यालाही तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Kolhapur  Crime |
Jitendra Awad : आव्हाडांवर कारवाईसाठी दबाब आणणारा तो 'चाणक्य' कोण ?

या प्रकरणामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राज्यभरात अशा ऑनर किलींगच्या घटना समोर आल्या होत्या. २०१५ मध्ये आंतरजातीय विवाह केल्यानंतर मेघा पाटील आणि तिचा पती काही दिवसांतच कसबा बावडा इथे राहायला आले होते. याची माहिती मिळताच दोन्ही भावांनी बहिण आणि तिचा पती काय करतात, कुठे जातात यावर नजर ठेवायला सुरुवात केली होती. मागोवा काढल्यानंतर गणेश आणि जयदीप यांनी थेट घरात घुसून मेघा आणि तिच्या पतीची हत्या केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com