आमदार आवताडेंची सत्ता जाणार? 'दामाजी'च्या निवडणुकीत चुरशीनं मतदान

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस...
BJP MLA Samadhan Awatade Latest News
BJP MLA Samadhan Awatade Latest News Sarkarnama

मंगळवेढा : भाजपचे (BJP) आमदार समाधान आवताडे यांच्या ताब्यात असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. मंगळवारी तालुक्यातील 108 मतदान केंद्रावर 28695 पैकी 24521 मतदारांनी हक्क बजावत चुरशीने मतदान केले. आवताडे यांचे सर्व विरोधक एकत्र आल्याने या निवडणुकीत त्यांना धक्का बसणार की पुन्हा सत्ता काबीज करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Samadhan Awatade Latest News)

मतमोजणी 14 जुलै रोजी होणार आहे असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निकालाची उत्सुकता आहे. मंगळवेढा, मरवडे, भोसे, आंधळगाव, ब्रह्मपुरी या पाच ऊस उत्पादक गटातील 108 केंद्रावर प्रशासनाने 28 हजार 535 सभासदांच्या तर याशिवाय संस्था मतदारसंघातील 160 मतदारासाठी मंगळवेढ्यात मतदान केंद्र ठेवण्यात आले. त्यामध्ये 24 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

BJP MLA Samadhan Awatade Latest News
माजी प्रदेशाध्यक्षांची भाजपला सोडचिठ्ठी; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

ब्रह्मपुरी गटात 6142 पैकी 5129, मरवडे गटात 6200 पैकी 5365, भोसे गटात 6036 पैकी 5251, आंधळगाव गटात 5520 पैकी 4726 मंगळवेढा गटात 4637 पैकी 3896 व संस्था मतदार संघातून 160 पैकी 154 इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष आमदार आवताडे यांच्या गटाविरोधात तालुक्यातील सर्व नेते समविचारी गटाच्या रूपाने एकत्रित आले आहेत.

कामगारांनीही ऐनवेळी आंदोलनाचे हत्यार उपसून सत्ताधारी गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ऐनवेळी चुलते बबनराव आवताडे यांनी पुतण्याच्या पाठीवर हात ठेवल्यामुळे सत्ताधारी गट मजबूत झाला. सत्ताधारी गटातून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अशोक केदार हे यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत. संस्था मतदारसंघात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या विरोधात जगन्नाथ रेवे यांचा उमेदवारी अर्ज सत्ताधारी गटाकडून होता. मात्र प्रचाराच्या अंतिम दिवशी सिद्धेश्वर आवताडे हे सत्ताधारी गटाच्या व्यासपीठावर आल्यामुळे या मतदारसंघातून विजयी होणारी जागा ही देखील सत्ताधारी गटाची होऊ शकते.

BJP MLA Samadhan Awatade Latest News
राऊतांच्या प्रचाराची पत्रके काहींनी गटारात फेकली! उदय सामंत यांचा लेटर बॉम्ब

दरम्यान, सभासदांचा आमच्या सहा वर्षाच्या कारभारावर विश्वास असून त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे आमदार आवताडे यांनी स्पष्ट केले. तर समविचारी आघाडीचे शिवानंद पाटील यांनीही विजयाचा दावा केला आहे. संस्था वाचवण्यासाठी ही निवडणूक सभासदाने हातात घेतली. सभासद व कार्यकर्त्यांनी केलेल्या एकजुटीमुळे आमच्या गटाचा विजय 2000 पेक्षा अधिक मताने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in