साई संस्थानमधील अधिकाऱ्याने महिलेला अश्लिल फोटो पाठविल्याचा आरोप : शिवसेना महिला आघाडी आक्रमक

शिर्डीतील ( Shirdi ) साई संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याने साईभक्त महिलेला अश्लील फोटो पाठवल्या संदर्भात राहाता तालुका शिवसेना ( Shivsena ) महिला आघाडीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
shirdi saibaba
shirdi saibabasarkarnama

शिर्डी ( अहमदनगर ) : शिर्डीतील साई संस्थान महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजले जाते. साई संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याने साईभक्त महिलेला अश्लील फोटो पाठवल्या संदर्भात राहता तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. Sai Sansthan official accused of taking obscene photos of women: Shiv Sena Mahila Aghadi aggressive

संबंधित अधिकार्‍याची चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित कारवाई करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असून संबंधित प्रकार गंभीर आहे. साई भक्तांशी निगडित असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनात हा प्रकार आणून देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

shirdi saibaba
नवी शिर्डी उभारणार : काकडी परिसराचे भाग्य उजळणार

राहाता तालुका शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख स्वाती सुनील परदेशी यांच्यासह महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सुनीता ननवरे, नेहा ननवरे, सपना कुमावत आदी उपस्थित होत्या.

shirdi saibaba
शिर्डी देवस्थान पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडे : आमदार आशुतोष काळेंकडे अध्यक्षपद

निवेदनात त्यांनी म्हटले की, मुंबई आणि आसाम येथील साईभक्त महिलेला साई संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याने महिलेला अश्लील फोटो पाठवले तशी तक्रारही साई संस्थांकडे या महिलेने केली आहे. महिला म्हणून या प्रकारचा आम्ही निषेध करत आहोत या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महिला शिवसेना आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com