साईभक्तांनी विमानसेवे समोर टेकले हात

जगभरातून साईभक्त शिर्डीत ( Shirdi ) येत असतात.
Airport New
Airport Newsarkarnama

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - जगभरातून साईभक्त शिर्डीत ( Shirdi ) येत असतात. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिर्डीतील विमानतळा बाबतचे अडथळे दूर केले आहेत. तरीही विमानसेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. शिर्डी विमानसेवेचा असाच कटू अनुभव काल ( रविवारी ) साईभक्तांना आला. शिर्डी विमानतळावरील विमानसेवेच्या या कारभारासमोर भक्तांनी हात टेकले. ( Sai devotees put their hands in front of the airline )

चेन्नई येथून शिर्डीकडे निघालेले विमान काल ( रविवारी ) दुपारी तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या दहा मिनिटांत पुन्हा माघारी न्यावे लागले. अडीच तासांत ते दुरुस्त होऊन पुन्हा मार्गस्थ होऊ शकले असते. मात्र येथील विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा नसल्याने उड्डाण रद्द करावे लागले. त्यामुळे या विमानाने ये-जा करणाऱ्या तीनशेहून अधिक साईभक्तांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.

Airport New
शिर्डी विमानतळ प्रश्नावर सुजय विखेंच्या प्रयत्नाला यश

काल दुपारी दोन वाजून 10 मिनिटांनी स्पाईस जेटच्या विमानाने 185 प्रवासी घेऊन शिर्डीकडे उड्डाण केला. दहा मिनिटात पाच हजार फुट उंचीवर असताना तांत्रिक बिघाडामुळे ते माघारी न्यावे लागले. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान अडीच तासांत दुरुस्त होऊ शकले असते. मात्र शिर्डीपर्यंत जाण्यासाठी त्याला दोन तास दहा मिनिटे वेळ लागणार होता.

तोपर्यंत सूर्यास्त झाला असता. विमान उतरविणे देखील शक्य झाले नसते. कारण शिर्डी विमानतळावर अद्यापही नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे उड्डाण रद्द झाले. तिकडून येणाऱ्या भाविकांनी येथे केलेले हॉटेल निवासाचे आरक्षण वाया गेले. याच विमानाने लगेचच तिकडे जाणाऱ्या 180 साईभक्तांचा येथील एक मुक्काम वाढला. दोन्ही बाजूच्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Airport New
त्या नेत्याने आपल्या एकुलत्या एक मरणासन्न मुलाचे ऑक्सिजन काढून घेतले

साडेतीन वर्षांपूर्वी हे विमानतळ सुरू झाले. त्यावेळी सहा महिन्यांत नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याची घोषणा झाली. तीन वर्षांत ती प्रत्यक्षात आली नाही. आता हे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या विमानतळाची उभारणी व संचलन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे. भारतीय विमान प्राधिकरणाचे निकष व तांत्रिक सल्ला घेऊन नाईट लँडिंगची सुविधा सुरू करायची आहे. ही सुविधा सुरू झाली, तर देशातील प्रमुख महानगरे या विमानतळाशी जोडली जातील. मात्र गेल्या तीन वर्षांत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे दृश्यमानता थोडी कमी झाली की येथील विमानसेवा विस्कळीत होते.

Airport New
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

विमानातील बिघाडामुळे आजचा प्रकार घडला. त्याचा नाईट लँडिंग सुविधेशी संबंध नाही. ही सुविधा येत्या दोन-तीन महिन्यांत सुरू होईल.

- सुशील श्रीवास्तव, संचालक, शिर्डी विमानळ

नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यात काय अडचणी आहेत, याची माहिती घेऊ. त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ.

- आमदार आशुतोष काळे, अध्यक्ष, श्रीसाई संस्थान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com