साईबाबा देवस्थानला तीन दिवसांत मिळाली साडेचार कोटीची देणगी

शिर्डीतील रामनवमी उत्सवाची माहिती देवस्थान विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
shirdi
shirdi Sarkarnama

अहमदनगर - शिर्डी येथे सालाबाद प्रमाणे रामनवमी निमित्त 9 ते 11 एप्रिल या कालावधीत उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना टाळेबंदीमुळे मागील दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नव्हता. टाळेबंदी शिथिल होताच यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाची माहिती देवस्थान विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. ( Sai Baba Devasthan received a donation of Rs 4.5 crore in three days )

आमदार आशुतोष काळे म्हणाले, शिर्डीतील रामनवमी उत्सवात तीन दिवसांत जवळ पास सव्वा तीन लाख लोकांनी दर्शन घेतले. या तीन दिवसांत चार कोटी 26 लाख 56 हजार 206 रुपये रोख स्वरूपात देणगी मिळाली आहे. सोने 332.680 ग्रॅम, चांदी सात हजार 673 ग्रॅम, परकीय चलन 11 लाख 20 हजार 226 रुपये अशी एकूण देणगी चार कोटी 57 लाख 91 हजार 187 रुपये मिळाली.

shirdi
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

ते पुढे म्हणाले की, भक्तांना आवाहन आहे की दर्शनासाठी कुटुंबासह आले असताना आपल्या बरोबर असलेल्या लोकांची व साहित्याची काळजी घ्यावी. सुट्टीचा आनंद घेत असताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कुठलीही गोष्ट अनुचित वाटली तर प्रशासन व अधिकाऱ्यांना सांगितली पाहिजे. सर्वांनी एकोप्याने रहावे. वाद होणार नाही याची काळजी घ्यावी.

shirdi
आशुतोष काळे म्हणाले, शरद पवार पंतप्रधान व्हावेत...

साईबाबा देवस्थानने रामनवमी उत्सवासाठी अंदाजपत्रक मंजूर केले होते. रामनवमी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहाने झाला. त्यासाठी व्यवस्थापन मंडळ, शिर्डी ग्रामस्थ त्यांची यात्रा कमिटीने यात्रेची तयारी चांगल्या प्रकारे करण्यात आली. त्यांनी यात्रेच्या निमित्ताने उपक्रम घेतले. रामनवमी उत्सव संपल्यावर सलग चार दिवस शासकीय सुट्या आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत आहेत. त्यांची व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळ करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com