Satara : शिवप्रतापदिनी प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फडकणार जरीकाठी भगवा

उत्सवात मर्दानी खेळ Masculine game, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा Powada या पारंपारीक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलिस मानवंदना Police salute देण्यात येणार आहे.
Eknath Shinde, Shambhuraj Desai
Eknath Shinde, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : किल्ले प्रतापगड येथे शिवप्रतापदिन येत्या यंदा 30 नोव्हेंबरला साजरा होणारा असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या शिवप्रतापदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याचे सुपूत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रतापगडावर भव्य जरीकाठी भगवा झेंडा फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध केला. स्वराज्य विस्ताराचा पाया ज्या गडाच्या पायथ्याशी घातला, इतिहासातील सर्वात मोठा प्रताप घडविला त्या किल्ले प्रतापगडावर अफझल खान वधाची तिथी दरवर्षी शिवप्रतापदिन म्हणून साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी ही तिथी बुधवार (ता. 30 नोव्हेंबरला) आहे.

शिवप्रतापदिन उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृष्‌यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde, Shambhuraj Desai
Patan : शंभूराज देसाई भडकले; म्हणाले, कोत्या मनाच्या लोकांना ते आवडले नसावे

जिल्हा प्रशासनाला सूचना करताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ध्वजस्तंभास शोभेल असा भव्य जरीकाठी भगवा झेंडा ठेवावा. संपूर्ण गडाला दोन दिवस विद्यूत रोषणाई करावी, लेझर शो, मशाल महोत्सव व आतिषबाजीचे आयोजन करावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यूत जनित्र ठेवावे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गावा-गावात जाऊन ग्रामस्थांना कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावे. जास्तीत जास्त नागरिक या उत्सवात सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करावेत.

Eknath Shinde, Shambhuraj Desai
Wai : प्रतापगड उत्सव समितीच्या २५ वर्षांच्या लढ्याला यश; पेढे वाटून आनंदोत्सव...

कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामे त्वरीत करावीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवात मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपारीक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलिस मानवंदना देण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या उपाय योजनांना प्राधान्य द्यावे. सर्व विभागप्रमुखांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

Eknath Shinde, Shambhuraj Desai
Satara : शंभूराज देसाई राष्ट्रवादीवर भडकले... म्हणाले कितीही ताकत लावा...

सुरवातीस सकाळी भवानी मातेची पूजा अभिषेक व आरती त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक, शिवपूतळ्यास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर पोवाडा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुप असणार आहे.

Eknath Shinde, Shambhuraj Desai
Patan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, आम्ही इतिहास घडवला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in