एसटी आंदोलनावरुन सदाभाऊ खोत यांचा सरकारला पुन्हा इशारा

सरकारने इंग्रजाप्रमाणे कर्मचाऱ्यांवर उगारलेला कारवाईचा बडगा मागे घ्यावा.
Sadabhau Khot
Sadabhau Khotsarkarnama

कोल्हापूर : अनेक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Strike) सुरु आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. खोत म्हणाले, एसटी कामगारांनी दाखवलेली एकजूट व रेट्यामुळेच सरकारने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली. हे कामगारांच्या आंदोलनातून पदरी पडलेले यश घेऊन कामगारांनी पुढे टप्प्याने टप्प्याने लढाईची सुरवात करावी. कामगाराच्या प्रश्नावर विधी मंडळाच्या सभागृहातून आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सरकारने इंग्रजाप्रमाणे कर्मचाऱ्यांवर उगारलेला कारवाईचा बडगा मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केला आहे.

Sadabhau Khot
कपिल पाटलांचा शिवसेनेला धक्का; नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

एसटी महामंडळाचे राज्य शासनत विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी संप, त्यातून परिवहन मंत्र्यांनी वेतनवाढीसह अन्य काही मागण्या मान्य केल्यानंतर खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतली. त्यानंतरही पुढे कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. याबाबत खोत म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांवर वर्षानुवर्षे अन्याय झाला. म्हणूनच अनेक सेवानिवृत्त अधिकारी, अर्थतज्ञांशी चर्चा करून एसटी कर्मचारी व प्रशासनाचे प्रश्न, एसटीची अर्थिक स्थिती, याचा अभ्यासकरून आम्ही सरकारशी चर्चा केली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी बाजू मांडली. आंदोलनात पहिल्यांदा जे यश मिळते, त्यातून जे पदरात पडलय, ते घेऊन नव्या लढायची तयारी करावी. या साठी दोनतीन टप्प्यावर आंदोलन करावे लागते, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातही कामगारांच्या बाजूने जनतेची सहानूभूती निश्चित आहे. जोपर्यंत अंतिम ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत जे मिळाले आहे, ते घ्यावे, असे खोत यांनी सांगितले. वीस वर्षात एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसीक वेतनात वाढ झल्याचे समाधान मला व पडळकर यांनाही आहे.

Sadabhau Khot
संतापजनक : गृहमंत्र्यांनीच पोलिसांची तुलना केली कुत्र्यांशी!

न्यायालयातून निलंबन रद्द होणार असेल आणि विलिनीकरण होणार असेल तर रस्त्यावरील लढाई कशासाठी करावी, असे प्रश्न काही एसटी कामगार करीत आहेत. याबाबत खोत म्हणाले, एसटी कामगारांचे प्रश्न येत्या सभागृहात मांडणा आहे. मात्र, तूर्त सरकार एसटी कामगारांवर निलंबन कारवाई ज्या पध्दतीने करीत आहे ती इंग्रजासारखी वागणूक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com