सदाभाऊ खोतांचा भाजपला दे धक्का!  मोदी सरकारच्या विरोधात उतरले मैदानात
Sadabhau Khotsarkarnama

सदाभाऊ खोतांचा भाजपला दे धक्का! मोदी सरकारच्या विरोधात उतरले मैदानात

सोयाबिन आणि इतर तेलबियांचे दर कमी झाले आहेत.

मुंबई : केंद्र सरकारने सर्व राज्यांना तेलाचा आणि तेलबियांचा साठा, वापरण्याचा आढावा घेऊन मर्यादा घालण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीचे अधिकार केंद्र सरकारने संबंधित राज्यांना दिले आहेत. राज्याने मात्र केंद्र सरकारचा आदेश धूडकावून शेतकर्यांच्या पाठिशी ठाम उभे रहावे, अन्यथा रयत क्रांती संघटना तेलबिया आणि सोयाबिन उत्पादक शेतकर्यांचे आंदोलन उभे करेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिला आहे. (Sadabhau Khot warns state government)

Sadabhau Khot
अजितदादांचे मामेभाऊ अध्यक्ष असलेल्या कारखान्यावरील शोधमोहीम तब्बल ८७ तासांनी संपली

खोत म्हणाले, केंद्र सरकारने खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी आधी सर्व प्रकारच्या खाद्यतेल आणि तेलबियांवर 31 मार्चपर्यंत म्हणजेच सहा 6 महिन्यासाठी साठा मर्यादा लादली. सोबत हंगामाच्या सुरुवातीला गरज नसतना 12 लाख मेट्रीक टन सोयापेंड आयातीला परवानगी दिली, नंतर खाद्यतेल आयात शुल्कात कमी केले. यामुळे आधीच सोयाबिन आणि इतर तेलबियांचे दर कमी झाले आहेत. नियमीत भाजपची बाजू भक्कम पणे मांडणारे खोत यांनी केंद्र सरकारचा आदेश राज्य सरकारने धुडकाऊन लावावा, असे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंच्चावल्या आहेत.

Sadabhau Khot
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली; पक्ष नेतृत्वाची उत्तर प्रदेशसाठी चार तास बैठक

अशात आता केंद्र सरकारने सर्व राज्यांना तेलाच्या आणि तेलबियांचा साठा, वापराचा आढावा घेऊन मर्यादा घालण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जर राज्य सरकारने साठा मर्यादा लावली तर शेतकर्यांच्या उरलेल्या मालाची माती होईल. त्यामुळे राज्याने केंद्र सरकारचा हा आदेश धूडकावून शेतकर्यांच्या पाठिशी ठाम उभे रहावे, अशी विनंती खोत यांनी केली आहे. त्यानंतरही जर राज्याने शेतकर्यांच्या विरोधातील काही निर्णय घेतला तर रयत क्रांती संघटना तेलबिया आणि सोयाबिन उत्पादक शेतकर्यांचे आंदोलन उभे करेल, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.