
नाशिक - यंदा राज्यात कांद्याचे भाव घसरले आहेत. अशातच आज रुई ( जि. नाशिक ) येथे ऐतिहासिक कांदा परिषद घेण्यात आली. यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपचे माजी खासदार माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली मते मांडली. सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी कांदाच्या भावा संदर्भात महाविकास आघाडीवर टीका केली. ( Sadabhau Khot said, the state government does not have time to look at onion issues ... )
कांदा परिषद नाशिक येथे शेतकऱ्यांच्या जागराला आणि कांदा उत्पादकांच्या आक्रोशाला सुरवात झाली आहे. याच ठिकाणी 1984 साली आदरणीय शरद जोशी यांनी कांदा परिषदेचे आयोजन सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी केलं होते. त्याचीच पुनरावृत्ती म्हणून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वखाली ऐतिहासिक अशा कांदा परिषदे आयोजन करण्यात आले.
सदाभाऊ खोत परिषदेत बोलताना म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी आणि आमचा संबंध खूप जुना आहे. आम्हीच कांद्यावरील निर्यात शुल्क 8 टक्के वरून 0 टक्के इतका कमी केला. तरीही कांद्याचा भाव वाढला नाही. मी पणन मंत्री असताना दुसऱ्या राज्यात निर्यात होणाऱ्या कांद्याला 25 हजारांपासून 75 हजारापर्यंत वाहतूक अनुदान देण्याचा निर्णय घेतला. 2 रुपये प्रतिकिलो कांदा अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिले आणि सुमारे दोनशे कोटी अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले.
ते पुढे म्हणाले की, मी पणन मंत्री असताना कांदा चाळीचे 11 कोटी रुपये नाशिक जिल्ह्याला देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. किसान रेल सुरु झाली पाहिजे ही भूमिका आम्ही मांडली. नाशिकला कांदा हब झाले पाहिजे. कांदा निर्यात सुविधा केंद्र बनले पाहिजे हा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे मांडला. राज्य सरकारला कांद्याच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही म्हणूनच आज कांदा परिषदेमध्ये हा शेतकऱ्यांचा आक्रोश आम्ही मांडत आहोत, असे त्यांनी सांगितले.
बांगलादेश सीमेवर उभा असलेला 800 टन कांदा अथक परिश्रमांनी बांगलादेशमध्ये निर्यात केला आणि कांद्याचे भाव वाढले. राज्य सरकारला दारूवरील कर 50 टक्के कमी करण्याचे बुद्धी आहे. परंतु कांद्यासाठी अनुदान मात्र देऊ शकत नाहीत. अशा अनेक विषयांना हात घालत सरकारवर टीकेची झोड उठवत कांदा परिषदेत कित्येक वर्षांचा आक्रोश जाहीर रित्या जनतेसमोर मांडला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.