तिकिट मिळाले नाही म्हणून पेरणी करणं कोणी थांबवतं का : सदाभाऊंचा निवडणुकीसाठी शड्डू

कोल्हापूर जिल्ह्यात साडेसहाशे कोटी रुपये, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नऊशे कोटी रुपयांची विकासकामे केली.
 sadabhau khot
sadabhau khot Sarkarnama

कुंभोज (जि. कोल्हापूर) : गेल्या निवडणुकीत लढण्याची मी संपूर्ण तयारी केली होती. मात्र, अंतिम क्षणी तिकिट मिळाले नाही; म्हणून पेरणी करणे थांबवायचे नाही. आगामी निवडणुकीसाठी आपण तयार आहोत,’’ अशा शब्दांत माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आगामी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला. (Sadabhau Khot gave hints to contest elections)

आमदार सदाभाऊ खोत आणि जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांच्या निधीतून दुर्गेवाडी येथील विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी खोत यांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले. उपसरपंच सचिन घोलप अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की, मी गेल्या निवडणुकीवेळीच ताकदीने लढण्याची तयारी केली होती. पण, अंतिम क्षणी तिकीट मिळाले नाही; म्हणून पेरणी थांबवायची नाही. एखाद्या वेळी पीक शेजारी कापून नेईल. पण, एक वेळी तर निश्चितपणे माझ्या खळ्यावर धान्यांची रास असेल. आगामी निवडणुकीसाठी आपण तयार आहोत.’’

 sadabhau khot
उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचे ते आव्हान स्वीकारले!

राज्यमंत्री म्हणून काम करताना निधी मागणाऱ्यांचा मी पक्ष बघितला नाही. त्यांचे काम बघितल्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात साडेसहाशे कोटी रुपये, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नऊशे कोटी रुपयांची विकासकामे केली, असेही माजी मंत्री खोत यांनी सांगितले.

 sadabhau khot
...तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता : उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

माजी आमदार सुजित मिणचेकर म्हणाले की, ‘‘धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांना सर्व सुखसुविधा पुरवण्याचे काम सरकारचे आहे. मात्र सरकारकडून दुर्लक्ष होत आहे.’’ जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव म्हणाले की, ‘कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात पाच वर्षांत सुमारे २५ ते ३० कोटींची विकासकामे केली आहेत.’’

 sadabhau khot
काँग्रेस नगरसेवकाचा भाजपकडून सत्कार अन्‌ विष्णूअण्णांनी केलेल्या पवारांच्या त्या सत्काराची आठवण ताजी!

गौरव नायकवडी म्हणाले, ‘‘धरणग्रस्तांनी आपली घरे पाण्याखाली घालवली, त्यांच्या पुण्याईमुळेच आज वारणा परिसर सुजलाम्‌ व सुफलाम्‌ आहे.’’ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्‍घाटन झाले. शादीक वारुणकर यांनी स्वागत केले. अरुण पाटील, अशोक पाटील, सुनील पाटील, लता पाटील, संगीता पाटील, सुलभा कदम, एम. एच. मुल्ला, आयुब पटेल आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com