महाविकास आघाडीने घेतला शेतकरी स्वातंत्र्याच्या नरडीचा घोट....

तुम्ही जर तुमचं भल करणाऱ्याच्या मागं भक्कम उभं राहिला नाहीत. तर, तुमच्या जीवावर उठणारे जिंकतात. शेतकरी Farmers चळवळीच्या इतिहासातील "सर्वात काळा दिवस" Black Day म्हणुन आजच्या दिवसाची नोंद होईल.
महाविकास आघाडीने घेतला शेतकरी स्वातंत्र्याच्या नरडीचा घोट....
Sadabhau Khotsarkarnama

सातारा : तीन कृषी कायदे मागे घेण्याची दुर्दैवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हा आघात शेतकऱ्यांना सहन होण्यापलिकडचा आहे. आता कोठे शेतकऱ्यांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची चार किरणे पसरण्याची शक्यता तयार झाली होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या अभद्र युतीने ही अंधुकशी शक्यताही हाणून पाडली. गेले वर्षभर अपप्रचाराचा गदारोळ उठवून शेतकरी स्वातंत्र्याच्या नरडीचा घोट घेण्यात वरील पक्ष यशस्वी झाले, अशी सडेतोड टीका रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

खरेतर केंद्र सरकारने आतापर्यंत ठामपणे या शेतकरी विरोधी पक्षांना दाद दिली नव्हती. पण, अखेरीस केंद्र सरकार नमले. कदाचित आगामी निवडणुका लक्षात घेऊन केंद्राने हे पाऊल उचलले असेल. पण हा निर्णय चुकीचा आहे, असे स्पष्ट करून सदाभाऊ खोत म्हणाले, शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या पाताळात गाडणारा आहे.

उषःकाल होता होता काळरात्र झाली.. उदरातच विझल्या स्वातंत्र्याच्या मशाली...

Sadabhau Khot
अन्नदात्यांना देशद्रोही, खलिस्तानी म्हटल्याबद्दल मोदींनी माफी मागावी...

आता परत एकदा नव्या जोमाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची कत्तल सुरू करतील. राजकीय दलाल आणि अडत्यांचे शेतकऱ्यांना लुटणारे अड्डे बळकट होतील. मार्केट कमिटीतील शेतकऱ्यांचे रक्त पिणार्या जळवांनी आता सुटकेचा निःश्वास टाकला असेल. मोदीजी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या नराधमांच्या हातात सोपवून तुम्ही फार मोठी चूक केली आहे असे खेदपूर्वक नमूद करतो.

Sadabhau Khot
निवडणुका नसल्यामुळेच केंद्र सरकार मराठा, ओबीसी आरक्षणावर काही निर्णय घेत नाही..

युगात्मा शरद जोशी म्हणायचे, "पिंजऱ्यात उंदीर सापडल्यानंतर त्याची जी अवस्था होते, तशी अवस्था शेतकऱ्यांची बाजार समितीत शेतीमाल घेऊन आल्यानंतर होते. या समित्या म्हणजे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत".मोदीजी हे कत्तलखाने बंद होतील. शेतकऱ्यांना पाहिजे तिथे आपला कष्टाने पिकविलेला शेतमाल विकता येईल, अशी स्पर्धात्मक व्यवस्था तयार होईल ही आशा आता मावळली आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांच्या फौजा नव्या जोमाने शेतकऱ्यांच्या वावरात शिरतील. त्याचा घाम गाळून पिकवलेला शेतमाल हव्या त्या दरात लुटून नेतील. स्वातंत्र्याच्या नवजात अर्भकाला गर्भातच नख लावण्याचे अमानवी कृत्य विरोधी पक्षाने केले आहे.

आता नव्या जोमाने जमतील लुटारूंच्या फौजा... काय करेल माझा शेतकरी राजा???

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in