
कऱ्हाड : राज्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालत आहेत. त्यामुळे त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. राज्यातील विरोधी पक्ष हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे सरकारला जागे करुन निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी कऱ्हाड ते साताऱ्यादरम्यान ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिली.
पदयात्रेची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत Sadabhau Khot बोलत होते. संघटनेचे नेते सचिन नलवडे, अमोलराजे जाधव, संजय साळुंखे, अशोक लोहार, शिवाजी पाटील, शंकर पवार, बाळासाहेब पवार, बापुराव जगदाळे, अनिल डुबल, नागराज शिंदे, प्रसाद धोकटे, सुनिल भुसाली, कृष्णा क्षिरसागर आदी उपस्थित होते.
आमदार खोत म्हणाले, राज्यातील शेतकरी, उस वाहतुकदार, सरपंच परिषद यांच्यावतीने ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे कोणालाच घेणे-देणे राहिलेले नाही अशी स्थिती इंडीयात झाली आहे. इंडियामुळे भारत मागे पडला असुन त्यात गावड्यातील शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात शेतमाल विकता येत नाही. जे पिकतय ते विकण्यासाठी सरकारचा आग्रह आहे.
मात्र शेतकऱ्याच्या पायात बेड्या घातल्या आहेत. दोन साखर कारखान्यातील 25 किलोमीटरचे अंतर कमी करावे, अनेक ऊसवाहतुकदारांचे पैसे मुकादमांनी बुडवलेले आहेत, ते त्यांना मिळावे, आठवडी बाजार सुरु करावे, गुजरातच्या धर्तीवर शेतकऱ्यांना चार हजार रुपये ऊसाला दर द्यावा, कृषी कर्जासाठी सिबीलची सक्ती रद्द करावी, तुकडे बंदी कायदा रद्द करावा, शेतकऱ्यांना कोठेही त्यांचा शेतमाल विकता यावा.
गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा आदी मागण्यांतुन सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी (त. 22) कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करून यात्रा तीन दिवसांच्या मुक्कामानंतर साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करेल. तेथे जाईपर्यंत आमच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास तब्बल दोनशे ते अडीचशे गाड्या घेवुन मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहोत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.