सदाभाऊंचा यू-टर्न! आधी केतकी चितळेचं समर्थन अन् नंतर माघार

सदाभाऊंच्या अंगावर राष्ट्रवादीचे संतप्त कार्यकर्ते गेले धावून
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) सोशल मीडियावर टाकली होती. यावरून मोठा गदारोळ सुरू आहे. या वादात सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी उडी घेत केतकीचे समर्थन केलं होतं. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंगावर धावून जाताच सदाभाऊंनी यू-टर्न घेतला आहे. केतकीचे समर्थन केलंच नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी तिचे समर्थन केले होते. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काल (ता.16) खोत हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सदाभाऊंच्या अंगावर धावून गेले होते. यानंतर सदाभाऊंनी खुलासा करीत केतकीचे समर्थन करीत नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, मी केतकीच्या पोस्टचं समर्थन केलेलं नाही. ती न्यायालयात खंबीरपणे उभी राहिली याचं कौतुक केलं आहे.

Sadabhau Khot
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्र भाजपमधूनच विरोध; थेट राजनाथसिंहांकडं धाव

आधी काय म्हणाले होते सदाभाऊ?

सदाभाऊ खोत म्हणाले होते की, केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली असे म्हणत देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली. त्यावेळी नैतिकता कुठे होती. या सोबतच अमोल मिटकरींनी ब्राम्हण समाजाला लक्ष्य केलं. त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का ..? स्वतःवर टीका केली की सगळे आठवते राज्यात सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवला असून प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा आहे.

Sadabhau Khot
करारा जवाब मिळेल! रुपाली पाटलांचं जगदीश मुळीकांना आव्हान

धर्मेंद्र प्रधानही उतरले मैदानात

अभिनेत्री केतकी चितळे हिच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. न्यायालयाने तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजप प्रवक्त्यांना मारतानाचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मैदानात उतरले आहेत. प्रधान यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांत सोशल मीडियावरून पोस्टवरून झालेल्या कारवायांच्या अनुषंगाने त्यांनी हे ट्विट केले आहे. आपण मानहानीकारक किंवा तेढ पसरवणाऱ्या पोस्टच्या बाजूने नसल्याचे सांगत त्यांनी पवार व केजरीवाल यांनी ही प्रकरणे खूप ताणल्याचे प्रधान यांनी म्हटलं आहे. (Ketaki Chitale Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com