फडणवीसांनी महापूरात गुंठ्याला ९५० रुपये अन् 'मविआ'ने १३५ दिले : सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल

Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांकडून देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कौतूक
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama

इंदापूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी महापूराच्या काळात ९५० रुपये मदत दिली होती. आता महाविकास आघाडी सरकारने १३५ रुपये दिले, तरीही उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सगळेच म्हणायचे सरकार खंबीर, असे म्हणतं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ते आज 'सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा' या यात्रेच्या सांगता सभेत बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, आज कांदा उत्पादक शेतकऱ्याची वाईट अवस्था झाली आहे. गुजरातमध्ये कांद्याला ३ रुपये प्रतिकिलो अनुदान दिले. मला वाटलं मुख्यमंत्री त्यांच्या सभेत कांद्यावर, ऊसावर बोलतील, द्राक्ष्यावर बोलतील. पण बोलायला उभं राहिल्यावर काय विचारले तर आमचे रक्त कसले? तुम्ही जनतेच्या प्रश्नावर काय बोलला? तुम्ही घोटाळे करता आणि ते पचवण्यासाठी रोज एक प्रकरण. काही तरी काढायचे आणि चघळत बसायचे.

केतकी चितळेची पोस्ट व्हायरल झाली. मी वाचली पण नव्हती. मला टीव्हीवाल्याने विचारेल आणि बोललो. पण अरे तुम्ही राज्य चालवताय की सोशल मिडीयावर बसलाय? देवेंद्र फडणवीस यांना आजवर विरोधकांनी प्रचंड दूषणं दिले. पण आजवर त्यांनी एकालाही तुरुंगात टाकले नाही. त्यांनी केवळ महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा विचार केला, असे म्हणतं खोत यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले.

पोलिस खात्याला राबवणं बंद करा :

गुन्हा होतोय एका जागी. कोणीही आत जावूदे. भाजपचे कोणीही आत जावूदे. राणा दाम्पत्य आत गेले. गुन्हा एका जागेवर आणि १० ते १२ ठिकाणी गुन्हे दाखल करतात. मला एक कळतं नाही. मडं इथले आहे आणि तिकडे गहिवर कशाला घालतात.आम्ही आमचं बघतो की. पोलिस खात्याला वेठबिगार सारखं कशाला राबवता. आमच्या बाबत पण तसंच केलं. पवार म्हणाले, मी पुन्हा येईन. मी पवारांना सांगु इच्छितो, देवेंद्र फडणवीस पुन्हा येणारचं. फक्त आल्यावर या डगल्यांपासून सावधं राहा. सत्ता आली की पळत येतात.

ऊसवाल्यांचे हाल म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही

ऊसवाल्यांचे खूप हाल आहेत. त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. २० टन ऊस गेला की २ टन काटा मारतात. त्याचा परिणाम म्हणजे आमची पिळवणूक होते. फडणवीस सरकारने एकरकमी एफआरपी केली. पण यांनी दोन टप्प्यात केली. फडणवीस सरकारने आम्हाला बाजार समितीमध्ये मताचा अधिकार दिला होता. पण तो पण यांनी काढून घेतला. माल आमचा मग मताचा अधिकार नको का? वीज फुकट देतो म्हणाले, ती दिले नाही. ७/१२ कोरा करतो म्हणाले, तो केला नाही. नुकसान भरपाई दिली नाही.

उजनीच्या संघर्षात आम्ही जनतेसोबत :

उजनीच्या पाण्याचा प्रश्न पण महत्वाचा आहे. मला बारामतीकरांचा अंदाज येत नाही. अखंड नीरा नदी घेतली, आता उजनीचे पाणी पण नेत आहेत. पण हे उजनीचे पाणी ही जनता जावू देणार नाही. आम्ही या पाण्यासाठी जनते सोबत आहोत. काळजी करु नको. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, आम्ही जर संघर्षाला उभं राहिलो तर तुम्ही आम्हाला साथ द्या अशी मागणी देखील सदाभाऊ खोत यांनी केली. डांळिंब, द्राक्ष यांची अवस्था वाईट आहे. कोकणातील शेतकऱ्याला अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, असे म्हणतं तुम्ही काहीही करा पण बारामतीच्या गड्यााला आता येवू देवू नका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com