सचिन पोटरे म्हणाले, रोहित पवार यांनी कर्जत तालुक्याचा अपमान केलाय

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी कुकडी प्रकल्प सल्लागार समितीवर कर्जत तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची नेमणूक केली आहे.
Sachin Potre
Sachin PotreSarkarnama

अहमदनगर - कुकडी प्रकल्प हा पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा समजला जातो. या प्रकल्पाच्या सल्लागार समितीवर लाभक्षेत्रातील तालुक्यांतून संबंधीत आमदारांनी एक लोकप्रतिनिधी पाठविण्याचा शासन आदेश आहे. त्यानुसार आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी कर्जत तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची नेमणूक केली आहे. हा मुद्दा घेऊन भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप केला आहे. ( Sachin Potre said that Rohit Pawar has insulted Karjat taluka )

नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांची तयारी व केंद्र सरकारच्या योजना कामांचा आढावा घेण्यासाठी आज नगरमधील भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सचिन पोटरे यांनी सरकारनामाशी संवाद साधला. या बैठकीला भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सरचिटणीस सचिन पोटरे, बाळासाहेब महाडिक, उपाध्यक्ष अशोक खेडकर, धनंजय बडे, किसान आघाडीचे सुनील यादव, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनी थोरात आदी उपस्थित होते.

Sachin Potre
रोहित पवारांनी राम शिंदे यांच्याकडे पाहिलेही नाही...

सचिन पोटरे म्हणाले की, कर्जत तालुका कुकडी सल्लागार समितीच्या सदस्यपदी कर्जत तालुक्यातील व्यक्तीचीच निवड होणे अपेक्षित आहे. असे असताना कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील व्यक्तीची निवड न करता श्रीगोंदे तालुक्यातील घनश्याम शेलार यांची निवड करण्यात आली आहे. वास्तविक कर्जत परिसरातील माहितीगार अथवा अभ्यासू असणाऱ्या महाविकास आघाडीतील कुठल्याही एका नेत्याची अथवा कार्यकर्त्याची त्यांनी निवड करणे अपेक्षित होती. तरी त्यांनी श्रीगोंदे तालुक्यातील व्यक्तीची निवड केली आहे.

ते पुढे म्हणाले की, हा कर्जत तालुक्याच्या अपमाना बरोबरच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचाही अपमान आहे. जेणे करून कुकडीचे प्रश्न या सल्लागार समितीने मांडायला कर्जत तालुक्यातीलच प्रतिनिधी हवा होता. तो त्यांनी न नेमता दुसराच व्यक्ती नेमून संपूर्ण कर्जत तालुक्याचा अपमान केला आहे. म्हणून त्यांनी कर्जत तालुक्यातीलच प्रतिनिधी नेमावा अशी मागणी भाजपतर्फे पोटरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com