सदाभाऊंच्या संघटनेच्या कार्यक्रमास फडणवीसांसह भाजपचे डझनभर नेते हजेरी लावणार

रयत क्रांती संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘जागर शेतकऱ्यांचा; आक्रोश महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी अभियानाचा समारोप येत्या शुक्रवारी (ता. २० मे) सायंकाळी पाच वाजता टेंभुर्णी (ता. माढा) येथे होणार आहे
Sadabhau Khot-Devendra Fadnavis
Sadabhau Khot-Devendra FadnavisSarkarnama

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘जागर शेतकऱ्यांचा; आक्रोश महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी अभियानाचा समारोप येत्या शुक्रवारी (ता. २० मे) सायंकाळी पाच वाजता टेंभुर्णी (ता. माढा) येथे होणार आहे. अभियानाच्या समारोपास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपच्या (BJP) डझनभर नेत्यांच्या उपस्थितीत टेंभुर्णीत जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Sabha of Devendra Fadnavis next Friday in Tembhurni)

प्रा. पाटील म्हणाले की, रयत क्रांती संघटनेच्या वतीने २९ एप्रिल २०२२ पासून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आमदार गोपीचंद पडळकर यांना सोबत घेऊन ‘जागर शेतकऱ्यांचा; आक्रोश महाराष्ट्राचा’ हे अभियान सुरू केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांत अभियानानिमित्ताने दौरा झाला आहे. याच अभियानाची सांगता शुक्रवारी टेंभुर्णीत जाहीर सभेने होणार आहे. टेंभुर्णी- करमाळा रस्त्यावरील सनराईज इंग्लिश स्कूलच्या मैदानावर ही सभा होणार आहे.

Sadabhau Khot-Devendra Fadnavis
हर्षवर्धन पाटलांनी आग्रह धरला अन्‌ अजितदादा आणि फडणवीस एकमेकांच्या शेजारी बसले!

राज्यातील आघाडी सरकारला सत्तेवर येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, लोकांचे प्रश्न सोडविण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरले आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार तरूणांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सरकार याकडे लक्ष न देता केवळ आरोप प्रत्यारोप करीत आहे. वीज समस्या, अतिरिक्त ऊस, ओबीसी व मराठा आरक्षण, रासायनिक खतांची टंचाई, महागाई, वाढत्या किंमती, पेट्रोल-डिझेल दरवाढ अशा अनेक प्रश्नांवर रयत क्रांती संघटनेने अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

Sadabhau Khot-Devendra Fadnavis
‘तू बोलू नकोस रे शहाण्या...तू आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेव ना’

प्रा. सुहास पाटील म्हणाले की,या अभियानाच्या टेंभुर्णीतील सांगता समारंभास फडणवी, खोत यांच्यासह खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात येऊन हे नेते कोणावर निशाणा साधणाार, याकडे माढ्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in