Karad : महापुरुषांबद्दल राज्यकर्त्यांना तारतम्य नाही : पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका

Sharad Pawar राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यासंबंधी केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल.
Sharad Pawar, Chandrakant Patil
Sharad Pawar, Chandrakant Patilsarkarnama

कऱ्हाड : कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची संस्था चालवताना तेथील मुलांना दोन वेळचे अन्न नसल्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले आणि मुलांना शिकवले. ते भिक मागत नव्हते. महापुरुषांनी दिलेले योगदान असुनही त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे. वक्तव्याबद्दलचे तारतम्य आजकालच्या राज्यकर्त्यांना नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांचा नामाोल्लेख टाळून केली.

खासदार पवार आज कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. . महापुराषाबद्दल नेते, मंत्री यांच्याकडुन केलेल्या जात असलेल्या वक्तव्याबाबत खासदार पवार म्हणाले, महापुरुषाबाबत कोणी काय चुकीचं बोललं तर लोकांना संताप येणारच. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची संस्था चालवताना तेथील मुलांना दोन वेळचे अन्न नसल्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले आणि मुलांना शिकवले ते भिक मागत नव्हते.

महापुरुषांनी दिलेले योगदान असुनही त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. याच्याबद्दलचे तारतम्य आजकालच्या राज्यकर्त्यांना नाही, असे म्हणत त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना नाव न घेता टोला लगावला. त्याचबरोबर राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यासंबंधी केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल, असेही यावेळी स्पष्ट केले.

Sharad Pawar, Chandrakant Patil
Birthday Special : शरद पवार यांच्या 'या' इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com