आगामी काळात मीच पंतप्रधान होणार! महादेव जानकरांचा मोठा दावा
Mahadev JankarSarkarnama

आगामी काळात मीच पंतप्रधान होणार! महादेव जानकरांचा मोठा दावा

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रासप लढवणार

म्हसवड (सातारा) : आगामी काळात देशाचा पंतप्रधान मीच होणार आहे, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला आहे. याचबरोबर आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसह म्हसवड पालिकेची निवडणूकही रासप (Rashtriya Samaj Paksha) स्वबळावर लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील म्हसवडमधील पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री जानकर यांना पंतप्रधानपदाचा दावा केला. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून सिमेंट रस्ते, जिहे-कठापूर योजनेअंतर्गत उत्तर भागातील गावांना पाणी, म्हसवडमधील केंद्रीय एमआयडीसी या योजना मीच पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतल्या. माण तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारी ही कामं आहेत. पण म्हसवड एमआयडीसीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खोडा घातला.

जानकर यांनी आटपाडीत काल विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, आम्हाला (राष्ट्रीय समाज पक्षाला) मंत्रिपद दिले. म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली नाही. आम्ही युतीत होतो; म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला. आम्ही युतीसोबत नसतो, तर फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री झाला असता का? देशातील दोन महत्वाचे पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसचे धोरण हे सारखेच आहे. ‘फोडा-झोडा आणि राज्य करा, छोट्या पक्षाशी दोस्ती करा, सत्ता मिळवा, वापर करा आणि त्यांना सोडून द्या,’ हेच धोरण दोन्ही पक्षांनी राबविले आहे. ते अनुभवले आहे. (Mahadev Jankar Latest News in Marathi)

Mahadev Jankar
कृष्ण प्रकाश यांच्याकडून दोनशे कोटींची वसुली? गृहमंत्री वळसे पाटलांचे चौकशीचे निर्देश

राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची दोन टक्के मते आहेत. महायुतीमध्ये आम्ही होतो; म्हणूनच फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाला होता. आम्हाला मंत्रिपद दिले होते, म्हणजे आमच्यावर मेहरबानी केलेली नाही. सोबत आम्ही नसतो तर विचार करा. आम्ही हेलिकॉप्टरमधून फिरणारे नव्हे; तर शेताच्या बांधावरचे नेते आहेत. विकासापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी हनुमान चालिसा, अजान, मंदिर, मशिद विषय पुढे केले जात आहेत, असा आरोपही जानकर यांनी केला होता.

Mahadev Jankar
संभाजीराजेंचं नेमकं कुठं चुकलं? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

'सब समान, देश महान' या धोरणाने रासपची वाटचाल सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाची धोरणे मात्र वेगळी आहेत. इतर पक्षांचे आमदार, खासदार फोडणे, वापरणे आणि सोडून देणे, हेच त्यांचे धोरण आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याचा लढा लढला आणि भाजपने त्याची फळे चाखली. आम्ही फक्त पालखीचे भोई राहिलो आहेत. दोन्ही पक्ष बहुजनांचे नाहीत. शाहू महाराजांच्या वंशजाला आज मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर यावे लागत आहे.,तर धनगर समाजाला आमदार- खासदार-सभापती पद दिल्यावर ते येड्यागत पळतंय. समाज मात्र आहे तिथेच आहे. तरुणांना हवे काय ते कोणच विचारत नाही, अशी खंतही जानकर यांनी बोलून दाखवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in