RPI News : 'रिपब्लिकन'चं राज्यव्यापी अधिवेशन शिर्डीत; राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते होणार दाखल !

Ramdas Athawale president in the session : अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी रामदास आठवले..
Minister Ramdas Athawale :
Minister Ramdas Athawale : Sarkarnama

RPI News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे. शिर्डी येथे येत्या रविवारी (ता.२८) रोजी आरपीआय आठवले गटाचे अधिवेशन आयोजित केले गेले आहे. यामुळे आरपीआयचे आठवले गटाचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीत दाखल होणार आहेत.

Minister Ramdas Athawale :
Pimpri Chinchwad: सेवा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार अश्विनी जगतापांनी थेट दिल्लीच गाठली

आरपीयच्या या राज्यव्यापी अधिवेशनात विशेष बाब म्हणजे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas athawale) हे अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Minister Ramdas Athawale :
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार; दोन नगराध्यक्षांसह १२ नगरसेवक शिंदे गटात दाखल

या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रित केले गेले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारी (ता. २७) शिर्डीत होणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी पुण्यात प्रत्येक प्रभागात बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच पुण्यातील तीन हजार कार्यकर्ते अधिवेशनाला जाणार आहेत, असे वाडेकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in