रोहित पवारांचा भाजपला सॉलिड टोला : म्हणाले...

या निवडणुकीत आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) व काँग्रेसच्या ( Congress ) उमेदवारांनी विजय मिळवत भाजपची सत्ता हेरावून घेतली.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

अहमदनगर - कर्जत नगर पंचायत निवडणूक ही राज्यभर गाजली. या निवडणुकीला भाजपचे ( BJP ) माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी प्रतिष्ठेची बनविली होती. या निवडणुकीत आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP )काँग्रेसच्या ( Congress ) उमेदवारांनी विजय मिळवत भाजपची सत्ता हेरावून घेतली. Rohit Pawar's solid tola to BJP: said ...

कर्जत प्रमाणेच राज्यातील विविध ठिकाणच्या नगर पंचायतींची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. या निवडणुकी संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवार कुटुंब व महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्याच प्रमाणे राज्यातील भाजपच्या विविध नेत्यांनीही या निवडणुकी संदर्भात प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रियांत महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात आले.

Rohit Pawar
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यातून उत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होऊ नये म्हणून अपयश लवपवण्याचा प्रयत्न होत असला तरी अपयशामागील कारणमिमांसा किमान भाजप नेतृत्वाने तरी समजून घायला हवी!, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांनी म्हटले आहे की, या विराट विजयाबद्दल सर्वप्रथम मी कर्जतकर मतदार बंधू आणि भगिनी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. विरोधकांनी साम-दाम-दंड-भेद अशी सर्व अस्त्रे वापरुन नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुजान कर्जतकरांनी त्यांना थारा दिला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com