NCP Vs BJP : रोहित पवारांचा नितेश राणेंना टोला : बाहेरून येऊन वातावरण गढूळ करणे लोकांना आवडले नाही

कर्जतमध्ये प्रतीक (सनी) पवार या युवकाची काल ( मंगळवारी ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भेट घेतली.
Nitesh Rane| Rohit Pawar|
Nitesh Rane| Rohit Pawar|Sarkarnama

अहमदनगर - कर्जतमध्ये प्रतीक (सनी) पवार या युवकावर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला सोशल मीडियावर नुपूर शर्माचा डिपी ठेवल्यामुळे झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे व गोपिचंद पडळकर यांनी केला आहे. या युवकाची काल ( मंगळवारी ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भेट घेतली.

या प्रसंगी उपस्थित पत्रकारांना रोहित पवार यांनी सांगितले की, प्रतीकला आज मी भेटलो. त्या आधी त्याचे काका व डॉक्टरांशी चर्चा केली. इन्फेक्सन वाढल्याचा अंदाज डॉक्टरांना आला. त्यामुळे मी भेटण्यासाठी आलो आहे. आज त्याची तब्बेत चांगली आहे. काळजी करण्यासारखे आता काहीही नाही.

Nitesh Rane| Rohit Pawar|
Rohit Pawar : 'राज्यपालांचा ७० वर्षातील इतिहासही कच्चा,' असं रोहित पवार का म्हणाले ?

कर्जत शहरात तुम्ही गेलात, तेथील सामान्य लोकांशी चर्चा केली तर त्यांची प्रतीक बरोबर सहानुभूती नक्कीच आहे. ज्या पद्धतीने यात राजकारण आणले गेले ते योग्य नाही, असे सामान्य लोकांना वाटते. बाहेरून येऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असाल तेथील लोकांना या गोष्टी आवडत नाहीत. तेथील लोकांसाठी त्यांनी या गोष्टी केल्या नसाव्यात. त्यांनी ही बातमी देशपातळीवर जावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला असावा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Nitesh Rane| Rohit Pawar|
कर्जतमधील घटनेने नितेश राणे आक्रमक : म्हणाले, तर लक्षात ठेवा आता हिंदुत्त्ववादी सरकार आहे.

हल्लेखोर गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. अशा स्थितीत पोलीस प्रशासनावर वेगळ्या पद्धतीने बोलत असाल तर ते योग्य नाही. शांततेत विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे असते. संवेदनशील राहून मार्ग काढणे आवश्यक असते. आवाज वाढवून बोलून मार्ग निघत नसतो. तेथील सामान्य नागरीक असलेले कर्जतकर एकत्रित बसून मार्ग काढतील असे त्यांनी सुचविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in