रोहित पवार म्हणाले, विकास करू शकणाऱ्या पक्षाला कर्जतची जनता सत्ता देईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी प्रसारमाध्यमांना आज प्रतिक्रिया दिल्या.
Rohit Pawar

Rohit Pawar

Sarkarnama

अहमदनगर : कर्जत नगर पंचायत निवडणुकीची आज ( मंगळवारी ) मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर दडपशाहीचा आरोप केला. एका प्रभागाची निवडणुकी संदर्भात न्यायालयात अपिल केले तर दुसऱ्या प्रभागाच्या निवडणूक प्रक्रिये विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी प्रसारमाध्यमांना आज प्रतिक्रिया दिल्या. Rohit Pawar said, the people of Karjat will give power to a party which can develop

रोहित पवार म्हणाले, कर्जत नगर पंचायतचे मतदान झाले. सर्व मतदारांना मी आवाहन केले होते की, संविधानाने दिलेला आपला हक्क बजावत असताना कुठल्याही प्रकारे कुणाच्याही दबावाच्या आहारी जावू नका. मनापासून तुम्हाला वाटतं जो उमेदवार विकास करू शकतो, जो पक्ष विकास करू शकतो त्या पक्षामागे आपले बहुमूल्य मत द्या. त्या नुसार कर्जतची सुज्ञ जनता विकास करू शकणाऱ्या पक्षाला सत्ता देईल, असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.

<div class="paragraphs"><p>Rohit Pawar</p></div>
भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज माघारी : रोहित पवार समर्थकांनी खेळला गुलाल

राम शिंदे म्हणाले, आमचा विकास डोळ्यासमोर आहे. समोरचे विकास करू म्हणत आहेत. दोन वर्षांत कोणत्याच विकासाचे काम केलेली नाही, अशी चर्चा असल्याचे मला प्रचारा दरम्यान जाणवले. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी ते दडपशाहीचे राजकारण करत आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून प्रचार सभा होत असताना आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत घरोघर जाऊन प्रचार केला. गाठी भेटी हेच रोहित पवार यांच्या प्रचाराचा भर होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in