रोहित पवार म्हणाले, भाजप ईडीचा बागूलबुवा उभा करतेय

जामखेड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या हस्ते काल ( शुक्रवारी ) झाला.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

अहमदनगर - जामखेड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या हस्ते काल ( शुक्रवारी ) झाला. या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप व ईडीच्या कारवायांवर जोरदार टीका केली. ( Rohit Pawar said, BJP is creating the ghost of ED )

आमदार रोहित पवार म्हणाले, 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाला तर त्यावर ईडी धाड टाकते. एका वकिलावर धाड टाकली गेली असेल कदाचित त्या वकिलाकडे वेगळी काही तरी माहिती असेल. त्यांच्या घरातील कम्प्युटर ताब्यात घेतले असे आम्हाला कळते आहे. मी त्यांना ओळखत नाही. मला कळाले की ते भाजप विरोधात बोलत होते. त्यांच्या कम्प्युटरमध्ये भाजपच्या लोकांच्या विरोधात अनेक माहिती आहेत. कदाचित ती माहिती घेण्यासाठी अथवा इतर कशासाठी ईडीचा वापर लोकशाहीला दाबण्यासाठी भाजपकडून होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे.

Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, राज्याच्या बजेटमधील पंचसूत्रीने विरोधाकांची पंचाईत होईल

ते पुढे म्हणाले की, नेत्यांवर ईडीच्या धाडी होतच होत्या. आता वकिलांवर सुरू झाल्या आहेत. उद्या जाऊन पत्रकारांवर अशा धाडी होतील. एखादा साधा कार्यकर्ता भाजप विरोधात बोलला तर त्याच्यावरही ईडीची धाड पडू शकते. त्यामुळे आगामी काळात ईडीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करावी लागेल असे वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला.

कुठेही ईडीचे अधिकारी दिसू लागले आहेत. राज्यातील काही नेत्यांकडून केंद्रातील भाजप नेत्यांकडे जी माहिती जाते त्याच्या आधारावर ईडीच्या कारवाई होतात. त्यामुळे राज्यातील भाजपच्या माजी आमदार व कार्यकऱ्यांना वाटतेकी आपण कोणावरही धाडी टाकू शकतो. जेव्हा लहान मूलं जेवत नसेल तर म्हणात बागूलबुवा येईल. तशाच पद्धतीने भाजपचे लोक ईडीला बागूलबुवा म्हणून वापरू लागले आहेत. त्यामुळे ईडी येईल अशा धमक्या ते देतात, अशी टीकाही त्यांनी केली.

Rohit Pawar
Video: तर मावळ मध्ये पार्थ पवारसाठी मी प्रचार करेल; रोहित पवार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्या बाबत ते म्हणाले, मुख्यमंत्री राहिलेल्या एखाद्या मोठ्या नेत्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली जाते. त्यावेळी जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते कदाचित कुठे तरी कमी पडत असावेत. म्हणून एवढ्या मोठ्या नेत्याला जिल्ह्याची जबाबदारी दिली. मतभेद असतात, ते वेगळ्या पक्षाचे आहेत. लोकांच्या हितासाठी व कार्यकऱ्यांना ताकद देत राहू. ते त्यांच्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तयारी सुरू असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

Rohit Pawar
भाजपच्या जिल्हा सरचिटणीसाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धमकी

दमबाजीचे समर्थन नाही

कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याला दमदाटी केलेली नाही. जर कोणी दमदाटी केली असेल तर त्या दमबाजीचे समर्थन मी करत नाही. ज्या व्यक्ती बद्दल राम शिंदे बोलत आहेत. त्यांची भाषणे जरा पहावीत. कर्जत-जामखेडची जनता म्हणते की हे ज्या पातळीवर जाऊन भाजपचे पदाधिकारी भाषण करतात ते आमच्या विचारांना न पटणारी आहे. राम शिंदे जर अशा पदाधिकाऱ्याची पाठराखण करत असतील तर त्यांची विचारसरणी काय असेल याचा अंदाज येतो, असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com