रोहित पवार म्हणाले, भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला लक्ष्य केलय...

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची तोफ डागली.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

जालना - जालना जिल्ह्यातील एका कारखान्याच्या कार्यक्रमाला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी संपर्क साधला. त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची तोफ डागली. ( Rohit Pawar said, BJP has targeted the culture of Maharashtra ... )

आमदार रोहित पवार म्हणाले, राज्यभर मनसे, भाजप व शिवसेनेच्या नेत्यांकडून हनुमान चालिसा कार्यक्रम सुरू आहेत. यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, आमचेही काही नेते, पदाधिकारी हनुमानाचे पूजन करणार आहेत. त्याच बरोबर इफ्तार पार्टी सुद्धा काही ठिकाणी ठेवली आहे. म्हणजे संतांनी दिलेला विचार व आपला सर्वांचा धर्म हा कार्यकरत राहण्याचा आहे. सामान्य लोकांच्या हितासाठी काम करणे. तोच धर्म तोच विचार आपण आत्मसाद करून पुढे घेऊन चाललो आहोत. तिच आपली खरी हिंदू संस्कृती आहे.

Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मोफत वकिली केली नाही...

ते पुढे म्हणाले की, लोकांत राहून लोकांचे प्रश्न सोडविणे, सामान्य लोकांच्या अडचणी सोडविल्या पाहिजे. हनुमानाकडून खऱ्या अर्थाने प्रेरणा घ्यायची असेल तर शक्ती, भक्ती, युक्ती, बुद्धी हे विषय सुद्धा आपण समजून घेतले पाहिजेत. शेवटच्या घटनापर्यंत हनुमान संपर्कात होते. त्यांनी समतेचा, एकतेचा संदेश दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत सामान्य लोकांवर अन्याय होई नये असा संदेश हनुमानाने दिला आहे. कर्मच आपला धर्म असेल तर कर्म आपण करत रहावं आणि धर्माचे राजकारण कोणी करत असेल तर त्यांचे आगामी काळात काय होणार हे सर्वजणांना कळेलच.

ज्येष्ठ नेते शरद पवार व महाविकास आघाडीला भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला लक्ष्य केले जात आहे. भाजपला केवळ स्वतःचे पडले आहे. त्यामुळे ते कुठल्याही पातळीला जाऊ शकतात. विकासाचे त्यांना काहीही पडलेले नाही. लोकांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. फक्त सत्तेत यायचे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. सत्तेसाठी ते कोणत्याही पातळीवर जातील. मात्र हे उत्तर प्रदेश नाही. येथे राजकारण वेगळ्या पातळीवरचे असते. इथले लोक हुशार आहेत. त्यांना काय योग्य काय अयोग्य हे त्यांना माहिती आहे. लोकशाहीच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार म्हणजेच विकास यालाच ते निवडतील, असा विश्वास मला वाटतो.

Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, भाजप ईडीचा बागूलबुवा उभा करतेय

भाजपकडून अजित पवार, शरद पवार, काँग्रेस व शिवसेनेच्या काही नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. लक्ष्य तर ते करणारच कारण कोल्हापूरचा निकाल ज्या बाजूने लागतोय त्यातून लोकशाही मार्गाने भाजप काही विजय मिळवू शकत नाही. मग काय करायचे तर लक्ष्य करायचे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मध्यमातून दबाव, सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी असे प्रकार सुरू आहेत. मला असे वाटते की, महाविकास आघाडीला नव्हे तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला लक्ष्य करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातीपातीचे राजकारण, धार्मिक राजकारण करायचं, विकासाचे मुद्दे बाजूला, युवकांचे मुद्दे बाजूला करायचे. आणि असे धार्मिक मुद्दे पुढे आणले जातात. धार्मिक वाद निर्माण करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला भाजपने लक्ष्य केलेय असे मला वाटते. महाराष्ट्र आधीही दिल्ली समोर झुकला नाही. आजही झुकणार नाही आणि उद्याही झुकणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar
Video: तर मावळ मध्ये पार्थ पवारसाठी मी प्रचार करेल; रोहित पवार

खासदार नवनीत राणांबद्दल बोलताना रोहित पवारांनी सांगितले की, भाजपचे आमदार त्यांच्याकडे कसे राहतील. त्यांचे आमदार त्यांच्याकडे ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यातून अफवा पेरल्या जात आहेत. हे दाखवाव लागत. हे राजकीय वातावरण ते निर्माण करतात. त्यांचे वक्तव्य हे राजकीय वक्तव्य आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे या पेक्षा तीन महिन्यांत जे सरकार पडणार होते. त्याला तीन वर्षे होत आली आहेत. यावरून समजून घ्या कोण कोणाच्या संपर्कात आहे. नवनीत राणा भाजपची भाषा बोलतायत, त्यांना पुन्हा भाजपच्या तिकीटावर निवडून यायचं असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com