रोहित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेना केली विनंती : माझ्या कामाचे श्रेय तुम्ही घ्या पण ते काम करा

कर्जत ( जि. अहमदनगर ) येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी मंजूर करून आणले होते.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

अहमदनगर - कर्जत ( जि. अहमदनगर ) येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी मंजूर करून आणले होते. मात्र शिंदे फडणवीस सरकारने आमदार रोहित पवारांना झटका देत मतदार संघात मंजूर झालेले दिवाणी न्यायालयाची मंजुरी स्थगित केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट करत राज्य सरकारवर टीका केली. तसेच स्थगिती उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. माझ्या कामाचे श्रेय तुम्ही घ्या पण दिवाणी न्यायालय करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ( Rohit Pawar requested Chief Minister Shinde )

रोहित पवार यांची फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची 'तारीख पे तारीख' या त्रासातून सुटका व्हावी आणि वकिलांचीही सोय व्हावी म्हणून गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन महाविकास आघाडी सरकार असताना मी कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली, असे त्यांनी सांगितले.

Rohit Pawar
रोहित पवार- राम शिंदे लढतीत सुरेश धसांचे महत्व कायम!

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, कदाचित, राज्य पातळीवरील मोठ्या निर्णयांना स्थगिती देताना तालुका पातळीवरील दिवाणी न्यायालयासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी, अशी विनंती त्यांनी केली.

Rohit Pawar
रोहित आणि वडिलांमधील नातं कसं आहे? सुनंदा पवार यांची भावनिक पोस्ट

केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला हरकत नाही, पण न केलेल्या कामाचं श्रेय घेणारे माझ्या मतदारसंघात अनेकजण आहेत. कदाचित मी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या दिवाणी न्यायालयाच्या बाबतीतही श्रेय घेण्यासाठी असे लोक पुढं यायला कमी करणार नाहीत, असा टोलाही त्यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com