नागेश पवार मृत्यूप्रकरणी रोहित पवार, राम शिंदेंनी उठविला विधीमंडळात आवाज

जामखेड येथील युवक नागेश रामदास पवार याचा पुण्यात मृत्यू झाला.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSarkarnama

अहमदनगर - जामखेड येथील युवक नागेश रामदास पवार याचा पुण्यात मृत्यू झाला. या प्रकरणी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) तर विधानपरिषदेत भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी बुधवारी (ता. 24) प्रश्‍न उपस्थित करून या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्षवेधले.

जामखेड येथून दोन महिन्यांपूर्वी पुणे येथे मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी गेलेल्या नागेश रामदास पवार या तरुणास रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. मात्र, रेल्वे पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

Ram Shinde Vs Rohit Pawar
मित्राच्या मदतीला धावून आले रोहित पवार ; म्हणाले, आदित्य ठाकरेंना सहानुभूती मिळेल..

या प्रकरणी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न मांडला. ते म्हणाले की, पुण्यातील रेल्वे पोलिसांनी नागेश पवारला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पवार कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे. राज्य सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडून याबाबत कोणतेही ठोस कारवाईचे आश्वासन दिले जात नाही. तसे आश्वासन मिळावे अशी मागणी त्यांनी केली.

तर याच प्रश्नी माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार प्रा. शिंदे यांनी हे प्रकरण पावसाळी अधिवेशनात मांडत, या तरुणास न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती गोरे यांनी आमदार शिंदे यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत चौकशी करून कारवाईचे आदेश दिले.

Ram Shinde Vs Rohit Pawar
तीन वर्षांनंतर राम शिंदे पुन्हा आमदार : कर्जत-जामखेडच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

जामखेड शहरातील आरोळे नगर भागातील नागेश रामदास पवार हा तरुण दोन महिन्यांपूर्वी मोलमजुरी करण्यासाठी पुण्याला गेला होता. त्यास पुणे येथील रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. या तपासादरम्यान पुणे रेल्वे स्टेशन पोलिसांनी त्यास मारहाण केली. मात्र, या अमानुष मारहाणीत नागेशचा मंगळवारी (ता. 23) रात्री मृत्यू झाला. या मृत्यूस पुणे रेल्वे स्टेशन पोलिसच जबाबदार आहेत, असा आरोप करीत, आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी पवारच्या नातेवाइकांनी केली आहे.

याबाबत भाजपचे अनुसूचित जाती-जमाती विभागाचे जामखेड तालुकाध्यक्ष संतोष गव्हाळे यांनी आमदार शिंदे यांना दूरध्वनीवरून कळवले होते. आमदार शिंदे यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधून, सरकारने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com