रोहित पवारांनी अहल्यादेवी होळकरांच्या जयंतीची चौंडीत केली तयारी : राम शिंदेंची झाली कोंडी

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) हे अहल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे 9 वे वंशज आहेत.
Ram Shinde News, Rohit Pawar News, Political News Marathi
Ram Shinde News, Rohit Pawar News, Political News MarathiSarkarnama

अहमदनगर - पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी आहे. त्यांचा जन्म गाव चौंडी हे जामखेड तालुक्यात येते. या तालुक्याचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महोत्सवाचे आयोजन केले आहे. रोहित पवार यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) हे अहल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे 9 वे वंशज आहेत. यापूर्वी सलग पाच-सहा वर्षे राम शिंदे हेच जयंती उत्सव करत होते. मात्र यंदा ते उत्सवात दिसणार नसल्याची चर्चा आहे. ( Rohit Pawar prepares for Ahalya Devi Holkar's birthday: Ram Shinde is in trouble )

या महोत्सवा विषयी माहिती देताना आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, आपल्या महाराष्ट्राच्या भूमित अनेक थोरव्यक्ती होऊन गेल्या. ज्यांचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला. त्यांचा विचार आपल्या आधीच्या पिढीने स्वीकारला आत्मसाद केला. तो विचार आपल्यापर्यंत पोहचविणे आणि तो विचार आपण पुढच्या पिढीपर्यंत घेऊन चाललो आहोत. यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अशा महान व्यक्तींपैकी एक पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर आहेत. (Rohit Pawar News)

Ram Shinde News, Rohit Pawar News, Political News Marathi
राम शिंदे म्हणाले, पक्षानुसार शेतीला पाणी सोडणार आहेत का?

ते पुढे म्हणाले की, अहल्यादेवी होळकरांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचा जन्म जामखेड तालुक्यातील चौंडी येथे झाला. या भूमित लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायला मिळाले याचा अभिमान मला आहे. 31 मे रोजी त्यांची जयंती आहे. अनेक वर्षांपासून त्यांची जयंती आपण उत्साहात साजरी करतो मात्र दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधामुळे ही जयंती साजरी करता आली नाही. 31 मे रोजी ही जयंती उत्साहात साजरी करणार आहोत. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, कर्जत-जामखेडमधील नागरिक व मी लोकप्रतिनिधी मिळून ही जयंती साजरी करणार आहोत. हा जयंती उत्सव चौंडी येथे 31 मे रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

Ram Shinde News, Rohit Pawar News, Political News Marathi
रोहित पवार-राम शिंदे एकाच मंचावर : ना एकमेकांकडे पाहिले... ना बोलले...

स्मारक होतेय सज्ज

जयंती उत्सवासाठी चौंडी येथील अहल्यादेवी होळकर यांचे स्मारक सज्ज करण्यात येत आहे. त्यासाठी तेथील मुर्तींना रंगकाम, स्मारकाची सफाई व विद्युत रोषणाईचे काम सुरू करण्यात आले आहे.

यांना दिले उत्सवाचे निमंत्रण

अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आदींना निमंत्रण देण्यात आले आहे.

Ram Shinde News, Rohit Pawar News, Political News Marathi
अहल्यादेवी होळकर युवा व्यवसाय समृद्धी अभियान जाहीर करा ः जानकर यांची पंतप्रधानांकडे मागणी 

अहल्यादेवी होळकरांची अशी सुरू झाली जयंती

मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी अहल्यादेवी होळकर यांची श्रावणी पोळ्याच्या दिवशी तिथीप्रमाणे पुण्यतिथी सुरू केली. 1999च्या सुमारास महादेव जाणकर यांनी चौंडीत अहल्यादेवी होळकर यांची सुरू केली. चौंडीतच त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. तसेच पाच पक्ष एकत्रित आणून महायुतीची स्थापनेची घोषणाही चौंडीतच झाली. अण्णासाहेब डांगेंमुळे ज्येष्ठ नेते शरद पवार हे चौंडी अहल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीला यापूर्वी एकदा आले होते. मात्र जयंती उत्सव कार्यक्रम आत्तापर्यंत महादेव जाणकर व राम शिंदे हे करत असल्याने शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. यंदा पहिल्यांदाच शरद पवार हे अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवात दिसणार आहेत. राम शिंदे हे अहल्यादेवी होळकर यांचे 9 वे वंशज आहेत. शिवाय ते चौंडी येथेच राहतात. असे असले तरी ते या जयंती उत्सवात दिसणार नसल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com