कर्जतमध्ये दोन वर्षांनी पुन्हा राम शिंदे विरुद्ध रोहित पवार सामना

कर्जत नगरपंचायतची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) व भाजपचे ( BJP ) माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, शिर्डी, कर्जत व अकोले या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम काल ( बुधवारी ) राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमानुसार 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. यात कर्जत नगरपंचायतची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. Rohit Pawar match against Ram Shinde again in Karjat after two years

कर्जत नगरपंचायत ही भाजपसाठी बालेकिल्ला आहे. मात्र रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. आपापसातच गटतटाचे राजकारण करणारे राष्ट्रवादीच्या कार्यकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर दम दिला आहे. एकाच विचाराच्या व्यक्तीकडे सर्व सत्ता स्थाने द्या. तरच विकास होईल असेही अजित पवार सांगून गेले आहेत.

Ram Shinde Vs Rohit Pawar
कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे झाले पुन्हा सक्रिय

मागील निवडणुकीत 17 जागांपैकी 12 जागा भाजपने, 4 जागा काँग्रेसने तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने जिंकली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागा लढविल्या होत्या. त्यातील एकही जागा मिळविता आली नव्हती. या 14 ही उमेदवारांच्या मतांची बेरीज चार अंकीही भरली नव्हती. आता मात्र आमदार रोहित पवार यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर राम शिंदे यांनी पराभवाचे खापर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फोडत आरोप केले होते. विखे पाटील ज्या पक्षात जात तेथे खोड्या करतात असेही म्हटले होते. त्यामुळे राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात काही दिवस पटत नव्हते. मात्र आता दोघांनी जमवून घेतले आहे.

Ram Shinde Vs Rohit Pawar
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

आमदार रोहित पवार यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक लालासाहेब शेळके, हर्षदा काळदाते आदी दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडविला आहे. प्रसाद ढोकरीकर हे कर्जत-जामखेड मतदार संघातील चाणक्य समजले जातात. भाजपची निवडणुकीतील सर्व रणनीती ढोकरीकर तयार करत होते. नामदेव राऊत यांना कर्जतमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का होता.

भाजपचे नेते राष्ट्रवादी गेल्यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी जाणाऱ्यांना जाऊ द्या, निवडणुकांत गर्दी त्यांच्याकडे आणि मतदान आमच्याकडे असेल, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे ढोकरीकर जरी गेले असले तरी खासदार सुजय विखे पाटील निवडणुकीत रणनीती आखताना दिसणार आहेत.

Ram Shinde Vs Rohit Pawar
देवेंद्र फडणवीस, राम शिंदे, बबनराव पाचपुते यांचा अजित पवारांनी घेतला समाचार, म्हणाले...

अजित पवारांची ती सभा...

जामखेड व कर्जत नगरपंचायतमधील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्यातील महाविकास आघाडीतील चार मंत्री आमंत्रित केले होते. यात काँग्रेसचे अशोक चव्हाण, शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचाही समावेश होता. त्यांनी रोहित पवारांच्या कामाचे कौतुक केले. अजित पवार यांनीही कर्जत-जामखेडच्या विकासासाठी लक्ष देणार असल्याचे सांगतानाच रोहित पवारांकडे सर्वसत्ता केंद्रे देण्याचे आवाहन करताना राम शिंदे यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या.

राम शिंदेंची पावसातील सभा

सुमारे 13 वर्षांनंतर राम शिंदे यांनी कर्जतमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केले. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमात भाषणे सुरू असतानाच पाऊस आला होता. पावसातही भाजपचे कार्यकर्ते व राम शिंदे यांचे समर्थक भाषण ऐकण्यासाठी उभे होते. या सभेने राम शिंदे यांनी चांगलेच शक्ती प्रदर्शन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com