रोहित पवारांनी राम शिंदे यांच्याकडे पाहिलेही नाही...

भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन केले. हे आंदोलन सुरू असतानाच आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह गोदड महाराजांच्या दर्शनाला काल ( मंगळवार ) गेले होते.
राम शिंदे, रोहित पवार

राम शिंदे, रोहित पवार

सरकारनामा

अहमदनगर : कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या दोन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. हे उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाने मागे घेतले असा आरोप करत भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन केले. हे आंदोलन सुरू असतानाच आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह गोदड महाराजांच्या दर्शनाला काल ( मंगळवार ) गेले होते. या घटनेची चर्चा राज्यभर होत आहे. Rohit Pawar didn't even look at Ram Shinde ...

कर्जत नगर पंचायतीची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार सध्या निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. सोमवारी ( ता. 13 ) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी दुपारी भाजपचे शहराध्यक्षांची पत्नी व आणखी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे एक प्रभाग बिनविरोध होणार आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राम शिंदे यांनी निवडणूक प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार रोहित पवार दडपशाही करत असल्याचा आरोप करत कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या गोदड महाराज मंदिरासमोर मूक आंदोलन सुरू केले. त्यांच्या समवेत त्यांचे कार्यकर्तेही आंदोलनात बसले होते.

<div class="paragraphs"><p>राम शिंदे, रोहित पवार</p></div>
भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज माघारी : रोहित पवार समर्थकांनी खेळला गुलाल

काल ( बुधवारी ) राम शिंदे व त्यांच्या समर्थकांनी काळ्या पट्ट्या लावून मंदिरासमोर बसले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास राम शिंदे व त्यांच्या समर्थकांनी मोर्चा काढून सभा घेण्याची तयारी केली होती. त्याच वेळी आमदार रोहित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करत गोदड महाराज मंदिराजवळ आले. त्यांनी राम शिंदेंसमोरूनच मंदिरात प्रवेश केला. उमेदवार व समर्थकांसह मंदिरात गोदड महाराजांचे दर्शन घेतले व राम शिंदेकडे न पाहताच प्रचार करण्यासाठी निघून गेले.

या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली असती, काही अघटित प्रकार घडला असता तर त्याला जबाबदार कोण होते, असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाकडे भावना व्यक्त केल्या. तर राष्ट्रवादीकडून राम शिंदे नौटंकी करत असल्याचा आरोप होत आहे. राम शिंदे यांना भाजपचे उमेदवार थांबविता आले नाहीत. त्याला जबाबदार राष्ट्रवादी कशी असा प्रश्नही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत आहेत.

<div class="paragraphs"><p>राम शिंदे, रोहित पवार</p></div>
नगरपालिका निवडणुकीत कर्जतमध्ये राजकीय नाट्य आणि राम शिंदे संतापले; पाहा व्हिडिओ

आमदार रोहित पवार यांनी मुद्दाम भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथविण्यासाठी आम्ही मंदिरासमोर बसलेलो असताना गोदड महाराज मंदिरात प्रवेश केला. आमदार पवार यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते व कर्जत मधील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. अशी स्थितीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवला असता तर त्याला जबाबदार कोण?

- सचिन पोटरे, अहमदनगर जिल्हा सरचिटणीस, भाजप.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com