आर.आर.आबांच्या मुलाला पुन्हा धक्का : स्वकीयांनीच केला घात

Kavthemahankal Nagar Panchayat कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत भाजप खासदार संजयकाका पाटील विजयी झाले आहेत.
Rohit R. R. Pawar
Rohit R. R. Pawar

Kavthemahankal Nagar Panchayat : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांना मोठा झटका बसला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत भाजप खासदार संजयकाका पाटील विजयी झाले आहेत. संजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडून रोहित पाटलांना मोठा धक्का दिला आहे.

Rohit R. R. Pawar
Rohit Pawar : शेतकरी उद्धवस्त झालाय...! रोहित पवारांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या दोन तर शेतकरी विकास आघाडीकडून दोन अर्ज दाखल केले होते. नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रावादीने एकहाती सत्ता स्थापन केली होती. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने राहुल जगताप यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून सिंधुताई गावडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी चार सदस्य फुटले, राष्ट्रवादीच्या चार सदस्य हजर न झाल्याने संख्याबळ सहा झाले होते. विरोधातल्या घोरपडे गटाची दोन मतं ही राष्ट्रवादीच्या उमेदवार राहुल जगताप यांना मिळाली. तर खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला आठ मते मिळाली.

राहुल जगताप आणि सिंधुताई गावडे यांना प्रत्येकी आठ मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीवर सोडत घेतली. यात सिंधुताई गावडे निवडून आल्या. त्यामुळे रोहित आर आर पाटील यांनी एकाकी झुंज देऊन दहा महिन्यांपूर्वी मिळवलेली सत्ता संपुष्टात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com