
Tasgaon: तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष काँग्रेस शिवसेना आघाडीच्या बाजार समिती बचाव पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर झाला. १८ पैकी तब्बल १४ जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता कायम असल्याचं दाखवून दिलं. काँग्रेस(Congress) चे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी बाजार समितीमध्ये प्रवेश केला. भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील (Rohit Patil) आणि सुरेश पाटील यांनी बाजार समिती राखण्यात यश मिळविलं आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक(Tasgaon APMC Election) अत्यंत चुरशीनं झाल्यानं मतमोजणीकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं होतं. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी तालुक्यातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मतमोजणी केंद्राबाहेर जमा झाले होते. जसजसे निकाल जाहीर होत गेले तसा राष्ट्रवादीच्या समर्थकांचा जल्लोष सुरू झाला. गुलालाचे उधळण करत आणि फटाक्याच्या आताषबाजीत प्रचंड उत्साहाने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
समितीच्या मतदानानंतर लगेचच मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते, १८६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी साडेपाच वाजता मतमोजणी सुरू झाली. सहा टेबल्सवर सुरू झालेल्या मतमोजणीचा हमाल तोलाईदार गटातून पहिला निकाल हाती भाजपच्या पारड्यात लागला.
स्वामी रामानंद भारती सूतगिरणी वर आमदार सुमन पाटील विजयाचे शिल्पकार सुरेश पाटील हे ही कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सहभागी झाले होते. विजयी उमेदवारांनी आर आर पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसची गेली ३० वर्षे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता आहे. या निवडणुकीत खासदार संजय पाटील(MP Sanjay Patil) यांनी सोसायटी गटातून बलदंड आव्हान उभे केले होते.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हान परतवत लावत आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले यांनी निवडणुकीत काँग्रेसच्या महादेव पाटील यांनी बाजार समिती प्रवेश केला तर गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला दोन जागा जादा मिळाल्या.
सुरेश मारुती बेले हे ४२ मते मिळवून विजयी झाले. पाठोपाठ व्यापारी गटाचा निकाल लागला त्यामधे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम लक्ष्मण माळी हे 125 मते आणि भाजपचे कुमार रामचंद्र शेटे हे 96 मते घेऊन निवडून आले.
पाठोपाठ ग्रामपंचायत गटाचे निकाल राष्ट्रवादीचे पारड्यात पडले त्यामध्ये सर्वसाधारण गटातून सुनिल भानुदास पाटील (४२३) अवधूत सुभाष शिंदे (३९९), अनुसूचित जाती जमाती गटातून राजाराम गुंडा पाखरे (३९८), आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातून धनाजी नारायण पाटील (३९९) असे चौघे निवडून आले. सोसायटीतून सर्वसाधारण गट संग्राम आबासो पाटील (४७६), रवींद्र वसंत पाटील (४७२), दत्तात्रय भिमराव थोरबोले (४६१), रामचंद्र सत्तू जाधव (४६०), विठ्ठल रामचंद्र पवार ( ४६०), अनिल विश्वासराव पाटील (४६०), बाजार समिती बचाव पॅनल चे महादेव सदाशिव पाटील (४४२) निवडून आले.
सोसायटी महिला राखीव गटातून राष्ट्रवादीच्या विजया शंकर पाटील (४८०), भाजपच्या रेखा रवींद्र पाटील ( ४६२), ओबीसी गटातून राष्ट्रवादीचे अंकुश सदाशिव माळी (४९६), विमुक्त जाती जमाती गटातून मुकुंद सुबराव ठोंबरे (४८५) विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा मिळाल्या तर बाजार समिती बचाव पॅनल चार जागांवर समाधान मानावे. महिला राखीव जागेवर झालेल्या फेर मतमोजणीत १ मताने रेखा पाटील विजयी घोषित करण्यात आल्या.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.