'रोहित तू बिनधास्त जा, तुझं काम झालं समज', गडकरींच्या शब्दांनी रोहित पाटील भारावले

Nitin Gadkari|NCP|BJP|Rohit Patil: राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे कौतुक करणारी आणि आभार मानणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
Nitin Gadkari & Rohit Patil
Nitin Gadkari & Rohit PatilSarkarnama

नवी दिल्ली : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkri) हे आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि सर्वपक्षांशी सलोख्याचे संबध ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या मंत्रालयामार्फत केल्या जाणाऱ्या कामाबाबत ते दूजाभाव करत नाही. मग काम घेऊन आलेला नेता आपल्या पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा हे ते बघत नाहीत, असे अनेकांकडून बोलले जाते. मात्र, आज याची प्रचिती दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर पाटील (R.R.Patil) यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांना आली आहे. त्यांनी गडकरींचे कौतुक करणारी आणि आभार मानणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

Nitin Gadkari & Rohit Patil
लवकरच सलीम आणि जावेदची भेट होणार; कंबोज यांचा राऊतांना टोला

तासगावमधल्या एका महत्त्वाच्या रस्त्याचं काम घेऊन रोहित पाटील यांनी आज गडकरींची नवी दिल्लीत भेट घेतली आणि आपली समस्या गडकरींच्या कानावर घातली त्यावेळी गडकरींनी रोहित यांचं म्हणणं ऐकून घेतल आणि लगेचचं त्यावर होकारार्थी मान डोलावली आणि "रोहित तू बिंदास्त जा... तू सांगितलेलं काम झालं असं समज", असे म्हटले. त्यानंतर 'दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे' या वाक्याची प्रचिती आल्याचं रोहित यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रोहित पाटीलांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं काय?

"आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. तासगाव बाह्यवळण रस्ता हा प्रस्तावित असून काही काम अपूर्ण राहिले आहे. स्व. आबा असताना ह्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मानस त्यांचा होता. ह्या रस्त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व नवीन तरुणांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी संधी उपलब्ध या रस्त्यामुळे होऊ शकते आणि शहरातील दळणवळण साठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतो हे गडकरी साहेबांना पटवून दिले."

"त्यामुळे सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा अशी विनंती त्यांना केली. नक्कीच हा बाह्यवळण रस्ता तासगावच्या विकासासाठी नवी नांदी असेल हा विश्वास मला आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नगज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा अशी विनंती केली. सदर दोन्ही कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश दिले असून लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली. त्याचबरोबर साहेबांनी कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन अभिनंदन केले. 'दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे' या वाक्याची प्रचिती आली. रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज", असे गडकरी म्हणाल्याचे रोहितने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, या पोस्टला अनेकांनी पंसद केले असून गडकरींच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतूकही केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com