Satara : कास बांधकामांसाठी फेरनियमावली करा; उदयनराजेंनी घेतली मंत्री लोढांची भेट

मर्यादित स्वरूपाचा विकास Limited Development या तत्त्वाखाली नियमावलीत फेरबदलास शासन लवकरच मंजुरी देईल. त्यानंतर कास पठारावरील Kaas plateau बांधकामांच्या संदर्भात समाधानकारक निर्णय होईल, अशी अपेक्षा उदयनराजेंनी Udayanraje Bhosale व्यक्त केली आहे.
Udayanraje Bhosale, Mangal Prabhat Lodha
Udayanraje Bhosale, Mangal Prabhat Lodhasarkarnama

सातारा : कास पठार परिसरात पर्यावरण पूरक विकास होण्यासाठी एक हजार मीटर उंचीवरील क्षेत्राच्या बांधकाम नियमावलीत फेरबदलाचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला. या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी मिळेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. या प्रस्तावाबाबत त्यांनी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.

या वेळी त्यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पालिकेचे प्रशासक अभिजित बापट, सातारा विकास आघाडीचे ॲड. दत्ता बनकर उपस्थित होते. यासंदर्भात दिलेल्या पत्रकात उदयनराजेंनी म्हटले, की कास पठार परिसराची जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या संयुक्त पाहणीत प्रादेशिक नगररचना आणि त्यातील आरक्षणे यासंदर्भात चर्चेद्वारे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. प्रादेशिक नगररचना योजनेतील नियोजित फेरबदल शासनाच्या मंजुरी करता सादर करण्यात आले आहेत.

Udayanraje Bhosale, Mangal Prabhat Lodha
Satara : कास पठारावर धावणार ई-बस; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची संकल्पना

या संदर्भात पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची आम्ही भेट घेतली. पर्यावरणाला ताण पडणार नाही, अशा मर्यादित स्वरूपाचा विकास या तत्त्वाखाली नियमावलीत फेरबदलास शासन लवकरच मंजुरी देईल. त्यानंतर कास पठारावरील बांधकामांच्या संदर्भात समाधानकारक निर्णय होईल, अशी अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. कास पठारावरील पर्यावरण संरक्षण पर्यटनवाढीस आवश्यकता मूलभूत सुविधा आणि नव्याने उपलब्ध झालेली रोजगाराची संधी अशात त्रांगड्यात येथील बांधकामांचा प्रश्न गुरफटला आहे.

Udayanraje Bhosale, Mangal Prabhat Lodha
'कास'ची पाईपलाइन हे उशिरा सूचलेले शहाणपण... शिवेंद्रसिंहराजेंची उदयनराजेंवर खोचक टीका

काही तक्रारदारांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण करण्याबरोबर स्थानिक मुद्दे पुढे करून एकांगी भूमिका घेतली आहे. मात्र, पर्यावरण संरक्षण रोजगार आणि पर्यटन या सर्व बाबी चिरकालीन लाभदायक आहेत. याचा विचार करून पर्यावरणावर ताण न पडता पर्यावरण पूरक तेथे बांधकामे कशी होतील याकरिता पर्यावरण आणि विकास यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. एक हजार मीटर उंचीवरील बांधकामाच्या संदर्भात लागू केलेल्या फेरबदलांना शासनाची मान्यता घ्यावी, असे निश्चित करण्यात आले होते. या संदर्भात नियमावलीत फेरबदलाचा प्रस्ताव आणि प्रादेशिक योजनेचे नकाशे अधिप्रमाणित करून ते नगररचना सहायक संचालक यांना सादर करण्यात आले आहेत.

Udayanraje Bhosale, Mangal Prabhat Lodha
Satara : रुचेश जयवंशी साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी, शेखर सिंह यांची बदली

सुवर्णमध्‍य साधण्‍याचा प्रयत्‍न

जिल्हाधिकारी यांनी सुद्धा संबंधित प्रस्तावांची शिफारस शासनाला केली आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील या प्रश्नासंदर्भात आम्ही स्वतः समक्ष चर्चा केल्याचे उदयनराजे यांनी सांगितले आहे. हे आराखडे शासनाकडून अधिक प्रमाणित होऊन पुन्हा बांधकामे नियमानुकूल होतील आणि पर्यावरणाचे संतुलन साधून सस्टेनेबल डेव्हलपमेंट याचा सुवर्णमध्य साधला जाईल, अशी अपेक्षा उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in