रोहित पवार-राम शिंदेंच्या संघर्षात अधिकाऱ्यांवर गंडांतर; विखेंनी अधिकाऱ्यांना केले निलंबीत

Ahmednagar News : हिवाळी अधिवेशनात अधिकारी निलंबीत
Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde
Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde Sarkarnama

Ahmednagar News : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि विधान परिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र, या दोघांच्या राजकीय संघर्षात आता तीन अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे.

त्यामध्ये कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसिलदार नानासाहेब आगळे यांना एकाच दिवशी निलंबित करण्यात आले. तर काल पुणे जिल्ह्यातील सहकार खात्यातील विशेष लेखा परीक्षक अजय देशमुख यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तीन अधिकारी निलंबित करून शिंदे यांनी पवार यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde
Winter Session : तुम्ही अजून सहकार खात्यात रुळला नाहीत ; पवारांनी पुन्हा सावेंना सुनावले..

थोरबोले व आगळे यांना निलंबित केल्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी अधिवेशनात केली. गौण खनिजप्रकरणी कारवाई करण्यात या अधिकाऱ्यांनी कुचराई केल्याची लक्षवेधी सूचना विधान परिषदेमध्ये शिंदे यांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. विभागीय महसूल आयुक्तांकडे चौकशी सोपविण्यात आली आहे. त्याचा एक महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

कर्जतमधील अवैध गौण खनिज उत्खनानासंबंधी शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी प्रातांधिकारी थोरबोले आणि तहसीलदार आगळे यांना निलंबित केल्याची घोषणा केली होती. नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे यासंबंधीची चौकशी सोपविण्यात आली आहे. गौण खनिज उपसा होत असल्याने कर्जत तालुक्यातील माळढोक अभयारण्यासह कर्जत व जामखेड तालुक्यातील पर्यावरणाची हानी होत असल्याने महसूल प्रशासनाने खडीक्रेशर बंद ठेवले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱ्यांनी दंड करून हे क्रेशर पुन्हा सुरू होते.

Radhakrishna Vikhe Patil, Rohit Pawar, Ram Shinde
Nashik News : नाशिकमध्ये ठाकरेंच्या गडाला हादरा; माजी आमदारासह ५० नेते शिंदे गटात प्रवेश करणार

एकाच दिवशी दोन महसूल अधिकारी निलंबित झाले आहे. या मुद्द्याला आमदार पवार व आमदार शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. तसेच अजय देशमुख यांच्यावरही नुकतीच निलंबनाची कारवाई झाली. इंदापूर तालुक्यातील बारामती अग्रो हा आमदार रोहित पवार यांच्या अधिपत्याखालील साखर कारखाना आहे. त्या प्रकरणात चौकशी अधिकारी अजय देशमुख यांनी चुकीचा चौकशी अहवाल देऊन सरकारची दिशाभूल केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे देशमुख यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in