निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला हवे होते अर्धे तिकीट : एसटी अधिकाऱ्यांनी नेले पोलीस ठाण्यात

एका निवृत्त आयएएस अधिकारी एसटी बसने प्रवासाला निघाले. अर्धे तिकीट दिले नाही म्हणून थेट नियमाला भिडले.
Tophkhana Police station
Tophkhana Police stationSarkarnama

अहमदनगर ( जि. अहमदनगर ) - देशातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळत आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढीसाठी आंदोलन करावे लागले होते. अशातच एका निवृत्त आयएएस अधिकारी एसटी बसने प्रवासाला निघाले. अर्धे तिकीट दिले नाही म्हणून थेट नियमाला भिडले. नियमावरून कंडक्टरही अडले. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोचले. मग पोलिसांनी महाराष्ट्राचे नियम सांगितल्यावर गप्प बसले. ( Retired IAS officer wanted half ticket: ST officers took him to police station )

त्याचे असे झाले, उत्तर प्रदेश केडरचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एम. एम. रस्तोगी आणि म्हैसूर (कर्नाटक) येथे केंद्र शासनाच्या सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी अँड रीसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएफटीआरआय) वैज्ञानिक असलेला त्यांचे चिरंजीव डॉ. नवीन रस्तोगी हे म्हैसूरहून शिर्डीला साईबाबा दर्शनासाठी गुरुवारी (ता. 23) रात्री कर्नाटक बसने पुण्यापर्यंत आले. पुण्याहून शिर्डीला येण्यासाठी पुणे-धुळे शिवशाही बसने (एमएच 6 बी डब्ल्यू 859) शिर्डीला येण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता निघाले.

Tophkhana Police station
शिवसेना खासदार लोखंडेंनी राज्यातील परिस्थितीवर दिली सावध प्रतिक्रिया : म्हणाले...

रस्तोगी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतीच्या तिकिटाची मागणी केली. वाहकाने पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले. तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी नसल्यामुळे तुम्हाला पूर्ण तिकीट घ्यावे लागेल, असे सांगितले. रस्तोगी पिता-पुत्रांनी आपले आधार कार्ड, तसेच ओळखपत्र दाखवून आधार कार्डवरील वयानुसार ज्येष्ठ नागरिक ठरत असल्याचे सांगितले. म्हैसूरहून पुण्याला येताना कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसने ज्येष्ठ नागरिकाचे तिकीट दिल्याचे दाखविले.

एसटी बसवाहक शिर्डीचे पूर्ण तिकीट 455 रुपये घेण्याबाबत ठाम राहिला. त्यामुळे रस्तोगी यांनी मंत्रालयातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना ही माहिती दिली, तसेच बस अहमदनगरला आल्यानंतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी अगर प्रमुखांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर बस एसटीच्या सर्जेपुरा विभागीय कार्यालयात आणण्यात आली. त्यामुळे प्रवासी अन्य बसमध्ये बसवून देण्याची मागणी करू लागले.

Tophkhana Police station
Video : राम शिंदे यांचे जल्लोषात स्वागत

अखेर सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि पिता-पुत्रांमध्ये वाद झाले. दोघांनीही एकमेकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले. रस्तोगी यांनी बस तोफखाना पोलीस ठाण्यात दुपारी एक वाजता नेली. एसटीचे वरिष्ठ अधिकारीही तोफखाना पोलीस ठाण्यात आले. त्यामुळे त्यांच्या समवेत या कार्यालयातील इतर कर्मचारी आणि वाहक, चालक आणि तिकीट तपासणी पथकातील इतर कर्मचारीही तोफखाना पोलीस ठाण्यात आले.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि रस्तोगी पिता-पूत्र यांचे म्हणणे ऐकून दोघांनाही समजावून सांगितले. त्यामुळे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय दोघांनी अखेर रद्द केला.

Tophkhana Police station
`एसटी`चे तुघलकी फर्मान; ज्येष्ठांच्या सवलतीचे वय ६५ वर्षे!

सवलत महाराष्ट्रासाठीच

ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात असलेली सवलत ही फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या नागरिकांसाठीच आहे. इतर राज्यांतील प्रवाशांना तिकिटात ही सवलत देता येत नाही. एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्रवाशांशी सौजन्याने आणि नियमानुसार वागतात.

- विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com