'किसन वीर'चा निकाल : मकरंद आबांच्या माथी विजयाचा गुलाल अन्‌ कर्जाचा बोजा

मकरंद आबांकडे Makrand Patil खंडाळा कारखाना Khandala Karkhana व किसन वीरची Kisan vir सत्ता आली असून त्यांना या दोन्ही कारखान्यावरील कर्जाच्या Loan डोंगराचे ओझे हालके करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
'किसन वीर'चा निकाल : मकरंद आबांच्या माथी विजयाचा गुलाल अन्‌ कर्जाचा बोजा
Makrand Patil, Nitin Patilsarkarnama

सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्वच्या सर्व म्हणजे २१ जागा जिंकत परिवर्तन घडवले. त्यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार साडे नऊ ते दहा हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले. तर माजी आमदार मदन भोसले यांच्या पॅनेलला शेतकरी सभासदांनी झिडकारल्याचे स्पष्ट झाले. भाजपसह शिवसेना आमदार महेश शिंदेंचे पाठबळ मिळूनही मदन भोसलेंना पराभव पत्करावा लागला आहे.

किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशीकांत शिंदे, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि प्रत्यक्ष रणांगणात असलेले आमदार मकरंद पाटील असे चार आमदार व एक सभापतींनी या निवडणुकीत लक्ष घातले होते.

Makrand Patil, Nitin Patil
किसन वीर निवडणूक : पहिल्या फेरीत मकरंद पाटलांच्या पॅनेलची आघाडी...

मकरंद पाटील यांना सभापती रामराजे, आमदार शशीकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ मिळाली. तर मदन भोसले यांना कोरेगावचे आमदार महेश शिंदेंसह भाजपचे पाठबळ मिळाले होते. पण, तरीही शेतकरी सभासदांनी मकरंद आबा व नितीन काका या पाटील बंधूंवर विश्वास दाखवत त्यांच्या हातात 'किसन वीर'ची सत्ता दिली. मकरंद आबांकडे खंडाळा कारखान्यानंतर आता 'किसन वीर'ची सत्ता आली असून त्यांना या दोन्ही कारखान्यावरील कर्जाच्या डोंगराचे ओझे हालके करण्यासाठी प्रयत्न करतानाच कारखाने सुरू करून शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा लागणार आहे.

Makrand Patil, Nitin Patil
किसन वीर निवडणूक ः राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर

आज वाई एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. एकुण १५४ मतदान केंद्रांपैकी पहिल्या टप्प्यात ७७ मतदान केंद्रांची मतमोजणी झाली. यामध्ये पहिल्यापासून मकरंद पाटील यांच्या पॅनेलने साडे तीन ते चार हजार मतांची आघाडी घेतली. तर दुपारनंतर दुसऱ्या फेरीतील मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मताधिक्य वाढत जाऊन ते दहा ते १२ हजारांवर गेले. उत्पादक संस्था गट ः आमदार मकरंद पाटील २३८, रतनसिंह शिंदे ९१.

Makrand Patil, Nitin Patil
किसन वीर निवडणूक : आमदार महेश शिंदेंची जादू चालली नाही...

राखीव जागांतील उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी : अनुसूचित जाती - जमाती ः किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल - संजय कांबळे २२७२४, शेतकरी विकास पॅनेल : सुभाष खुडे १२९९८. इतर मागास प्रवर्ग : किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल शिवाजी जमदाडे २२६१०, शेतकरी विकास पॅनेल आनंदा जमदाडे १३०९५, मताधिक्य : ३९१४. भटक्या विमुक्त जाती जमाती : किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल हणमंत चवरे २२६६१, शेतकरी विकास पॅनल चंद्रकांत काळे : १३०६२.

Makrand Patil, Nitin Patil
आमदार गोरेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक; महेश तपासे घेणार सातारा एसपींची भेट...

महिला राखीव ः सुशीला जाधव यांना २२३९४, सरला श्रीकांत वीर २१५६२ मते मिळाली आहेत. तर विरोधी आशा फाळके यांना १२९६६ तर विजया साबळे यांना १२७८७ मते मिळाली आहेत. कवठे-खंडाळा गट : किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे रामदास गाढवे २२१५५, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन जाधव पाटील यांना २२२२४, किरण राजाराम काळोखे २१७१६. तर विरोधी शेतकरी विकास पॅनेलच्या दत्तात्रेय गाढवे यांना १२६९३, प्रवीण विनायक जगताप १२४५३, प्रताप ज्ञानेश्वर यादव १२५१६ मते मिळाली आहेत.

Makrand Patil, Nitin Patil
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची घाई : रामराजे

भुईंज गट ः किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलचे प्रकाश धुरगुडे यांना २१६७९, रामदास महादेव इथापे २१५६८, प्रमोद भानुदास शिंदे २१५०७. तर शेतकरी विकास पॅनेलच्या जयवंत पवार १२६५३, दिलीप शिंदे १२३६६, मदन प्रतापराव भोसले १२९७० मते मिळाली. तर अपक्ष मानसिंग नारायण शिंगटे यांना १५२ मते मिळाली आहेत.

Makrand Patil, Nitin Patil
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, उदयनराजेंना माझं बोलणं झोंबलं....

वाई - बावधन - जावली गट ः किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल शशिकांत मदनराव पिसाळ २२०५८, दिलीप आनंदराव पिसाळ २२३५९, हिंदुराव आनंदराव तरडे २१४६९ (बावधन) तर विरोधी शेतकरी विकास पॅनेल- सचिन आप्पासाहेब भोसले १२८३८, चंद्रसेन सुरेशराव शिंदे १२३४८, विश्वास रामराव पा़डळे १२५२३.

Makrand Patil, Nitin Patil
हिंमत असेल तर कुटुंबाच्या संपत्तीची अदलाबदल करा...मदन भोसलेंचे मकरंद पाटलांना आव्हान

सातारा गट ः किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल - संदीप प्रल्हाद चव्हाण २२११०, सचिन हंबीरराव जाधव २२०३६, बाबासाहेब शिवाजी कदम २१८३३. शेतकरी विकास पॅनेल चंद्रकांत बजरंग इंगवले १२६७६, भुजंगराव जिजाबा जाधव १२४०१, अनिल पांडुरंग वाघमळे १२२११, अपक्ष नवनाथ रघुनाथ साबळे १७१.

Makrand Patil, Nitin Patil
संभाजीराजे, उदयनराजे अन् शिवेंद्रराजे येणार एकत्र

कोरेगाव गट ः किसन वीर कारखाना बचाव पॅनेल ललित जोतीराम मुळीक २१५६७, संजय अरविंद फाळके २१६७३, सचिन घनश्याम साळुखे २१५३२, शेतकरी विकास पॅनेल शिवाजी रामदास पवार १२३५९, मेघराज सुरेश भोईटे १२७८७, नवनाथ निवृत्ती केंजळे १२४०७, अपक्ष - दिलीप उध्दव जाधव १५८, रमेश दगडू माने ८०.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.