Satara : राजीनामा द्या, पुन्हा निवडून येवून दाखवा : शंभूराज देसाईंचे राऊतांना आव्हान

Sanjay Raut संजय राऊतांनी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिउत्तर दिले.
Shambhuraj Desai, Sanjay Raut
Shambhuraj Desai, Sanjay Rautsarkarnama

Satara News : संजय राऊत Sanjay Raut हे कधीच लोकांतून निवडून आलेले नाहीत. डॉ. श्रीकांत शिंदेची Dr. Shrikant Shinde चिंता करण्यापेक्षा त्यांनी आमच्या आमदारांच्या मतांवर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि राज्यसभेवर पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी खासदार राऊतांना दिले आहे.

संजय राऊतांनी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिउत्तर दिले. शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊतांच्या विधानाकडे आम्ही कधीच गांभीर्याने पहात नाही. गांभीर्याने घेण्यासारखे त्यांचे वक्तव्य नसतेच. त्यांनी डॉ. श्रीकांत शिंदेंच्या खासदारकीची चिंता करु नये.

राऊत कधीच लोकांच्यातून निवडून आलेले नाहीत. नगरपालिका, विधानसभा, खासदारकीलाही ते निवडून आलेले नाहीत. ते राज्यसभेतून खासदार झाले आहेत. सहा महिन्यापूर्वी आमच्या आमदारांच्या मतांवर ते खासदार झाले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्याव व राज्यसभेवर निवडून येऊन दाखवावे.

Shambhuraj Desai, Sanjay Raut
Patan : मुंबईकर शेठजींमुळे निवडणुकांत पैशांचा तमाशा... सत्यजितसिंह पाटणकर

आमदारांची मर्यादीत मते असतात. तुम्ही स्वत:ला राष्ट्रीय नेते समजता खूप मोठे राष्ट्रीय प्रवक्ते आहात. आमच्या कल्याणच्या जागेची चिंता करु नका. आमच्या मतांवर निवडून आलेल्या खासदारकीचा राजीनामा द्या व परत निवडून येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

Shambhuraj Desai, Sanjay Raut
Patan : पाटणला 'जल जीवन'च्या ८८.४२ कोटींच्या १४० कामांना मंजूरी : मंत्री पाटील

डॉ. शिंदेंचा त्यांच्या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून लोकांच्या कामांबाबत त्यांच्यात तळमळ असून ते कामाचा पाठपुरावा सातत्याने करत असतात. या मतदारसंघात त्यांची लोकप्रियता आहे. त्यांनी मोठी कामेही केलेली आहेत. हे सर्व एकदा संजय राऊतांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन बघावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Shambhuraj Desai, Sanjay Raut
Satara : रम्मी खेळण्यासाठी तो चक्क बॅटऱ्या चोरायचा; पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com