नगर जिल्ह्यातील काही गट, गणांचे आरक्षण बदलणार? : 70 हरकती दाखल

जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन दिवसांत तब्बल 70 हरकती दाखल झाल्या.
Ahmednagar
AhmednagarSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. या आरक्षण सोडतीच्या वेळी काही नियम डावलण्यात आल्याचा आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन दिवसांत तब्बल 70 हरकती दाखल झाल्या. ( Reservation of some groups, ganas in Ahmednagar district will be changed: 70 objections filed )

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 28 जुलैला जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची प्रक्रिया झाली. या प्रक्रियेत आरक्षित करण्यात आलेल्या प्रभागाच्या घोषणेवर नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या. यामध्ये आज अखेर एकूण 70 हरकती दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे काही गट व गणांतील आरक्षण बदलण्याची चिन्हे आहेत.

Ahmednagar
भाऊ कोरगावकरांचा पत्ता कट : सुनील शिंदे व बबन घोलपांवर नगर जिल्हा शिवसेनेची जबाबदारी

सोमवार (ता. 1)पर्यंत 35 व आज (ता. 2)ला अखेरच्या दिवशी आणखी 35 हरकतींची त्यात भर पडली. दरम्यान हरकतदारांची आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चर्चा केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपस्थित असलेले हरकतदार यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महसूल उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी मार्गदर्शन केले. राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आरक्षणाची पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले.

अखेरच्या दिवशी हरकती दाखल केल्यात अरविंद साळवी, बेलापूर (शिरसगाव उंदिरगाव बेलापूर गणाबाबत), संजय घुगे (मानोरी गणाबाबत), संदीप मगर (दत्तनगर गट व गणाबाबत), संपत बावडकर (मिरजगाव गणाबाबत), जितेंद्र तोरणे (श्रीरामपूरमधील चारही गटाबाबत), अण्णासाहेब कांदळकर (श्रीरामपूरमधी सर्व गटाबाबत), संदीप मगर व इतर चौघे (दत्तनगर), ज्ञानेश्वर पेचे (पाचेगाव गट-गणा बाबत), रमेश दत्तू घोरपडे (पाचेगाव गट), श्रीकांत ठवाळ (आढळगाव गट आरक्षण बदलू नये), अनिल ठवाल (काष्टी गटाचे फेरआरक्षण करणे), ज्ञानदेव सालबंदे (सात्राळ गट), सचिन बापूसाहेब पवार (शिरसगाव गण), तात्याराम घोडके (आढळगाव गटाचे आरक्षण कायम ठेवणे बाबत), शांताराम संगारे (अकोले पंचायत समिती सर्व गण आरक्षण चुकीचे), रामदास बाचकर (बारागाव नांदूर गट), राजेंद्र ढोकचवळे (तालुक्यातील चारही गट आरक्षण आक्षेप), किशोर रामू शिंदे (अकोले पंचायत समिती एक ते बारा गणावर आक्षेप), जालिंदर ठोकळ(श्रीरामपूर मधील उंदिरगाव, टाकळीभान, दत्तनगर व बेलापूर गट), शंकर नेहे(अकोलेतील सर्व गण), सुखदेव येसेकर (श्रीरामपूरमधील चार गटाविरोधात), नंदा पवार (बेलापूर गणा बाबत), भाऊसाहेब शिंदे (बेलपिंपळगाव गट), सुरेश डिके (बेल पिंपळगाव गट), गहिनीनाथ पालवे (कोरेगाव गट), सचिन पोटरे (चापडगाव गट), निखिल शेलार, विजय रसाळ (पूर्ण ८५ गटाबाबत), सचिन कराळे (भेंडा बुद्रुक गट आरक्षण बदलाबाबत), विजय पांढरे (सर्व गण-गटांची आरक्षण प्रक्रिया पुन्हा करणे बाबत), विजयसिंह गोलेकर (जामखेडमधील गटांच्या आरक्षणाची सुधारित अधिसूचना जाहीर करणेबाबत), मच्छिंद्र धुमाळ (अकोलेतील गट एक ते सहाचे काढण्यात आलेले आरक्षण चुकीचे), रवींद्र ढेपे (श्रीरामपूरमधीलगट आरक्षणास हरकत), बाबासाहेब भागवत (बेलपिंपळगाव गट आरक्षण हरकत), अमोल खताळ (जिल्ह्यातील सर्व घटना रचना नव्याने सोडतीसह व्हावी) यांचा समावेश आहे.

Ahmednagar
नगर जिल्हा परिषदेसाठी मनसेची तयारी सुरू : संगमनेरमध्ये झाली बैठक

हरकदार म्हणतात सुनावणी झाली

जिल्हाधिकारी यांनी आरक्षणावर हरकती दाखल केलेल्यांशी चर्चा केली. त्यातील काहीजण म्हणतात दाखल हरकतींवर जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतली. मात्र प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतेही हरकतीवर सुनावणी घेण्याची सूचना नाही. त्यामुळे ही सुनावणी नसून चर्चा झालेली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

काही गटांचे आरक्षण बदलणार

जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर हरकती दाखल झालेल्या आहेत. या हरकतीवर आता निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे. त्यानंतर आरक्षणात बदल होणार आहे. काही शुध्द पत्रकात करेक्शन केले जाणार आहे. त्यामुळे काही ठिकाचे आरक्षण बदलणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com