Sangli ZP : संग्रामसिंह देशमुखांचा पत्ता कट तर सम्राट महाडिकांसाठी संधी

Sangli ZP Election : सांगली जिल्हा परिषदेच्या ६८ गटांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली आहे.
 Sangli ZP Election Latest News
Sangli ZP Election Latest News Sarkarnama

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या (Sangli ZP) ६८ गटांची आरक्षण सोडत आज (ता.२८ जुलै) काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) ही सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ८, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट आरक्षित झाले आहेत. यामध्ये ३४ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (Sangramsingh Deshmukh) आणि प्राजक्ता कोरे, (Prajakta Kore) माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आणि शिवाजी डोंगरे यांच्यासह दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. या सोडती रितेश चित्रुक या लहान विद्यार्थ्याच्या हस्ते काढण्यात आल्या. गेल्या चार निवडणुकांतील आरक्षण वगळून हे आरक्षण काढण्यात आले. नव्या पुनर्रचनेनुसार जिल्हा परिषदेचे ६८ गट आहेत. २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या चार निवडणुकांमधील आरक्षणाचा विचार करण्यात आला. (Sangli ZP Election Latest News)

 Sangli ZP Election Latest News
Satara : विकासपुरुष आहात तर लोकसभेला पराभव का झाला... शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

जिल्ह्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या कमी असल्याने या प्रवर्गासाठी जागा आरक्षित केली नाही, तर लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातींसाठी आठ गट निश्‍चित करण्यात आले. त्यातून महिलांच्या चार जागांसाठी सोडत काढण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) १८ जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यातील ९ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. याच पद्धतीने सर्वसाधारण ४२ गटांचे आरक्षण निश्‍चित केले. मणेराजुरी, चिंचणी, कुंडल, कुरळप, अंकलखोप, बागणी हे मतदारसंघ पुन्हा खुले झाले आहेत.

हरकतींना २ ऑगस्टपर्यंत मुदत

आरक्षण सोडतीबाबतच्या हरकती २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद गटाची हरकत जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समिती गणांची हरकत तालुक्यात तहसील कार्यालयात द्यायची आहे.

गटनिहाय आरक्षण

सर्वसाधारण (एकूण जागा ४२) ः सर्वसाधारण खुले (२१) ः तडसर, आरग, करगणी, देवराष्ट्रे, चिंचणी, कवठे एकंद, मणेराजुरी, ढालगाव, कुंडल, अंकलखोप, कासेगाव, बागणी, वाळेखिंडी, मुचंडी, येळावी, वाटेगाव, पेठ, कुरळप, पणुंब्रे तर्फ, मांगले, भोसे.

महिला राखीव (२१) : आटपाडी, उमदी, भाळवणी, कडेपूर, विसापूर, रेठरेहरणाक्ष, नेर्ले, सागाव, मालगाव, नांद्रे, कसबे डिग्रज, हरिपूर, म्हैसाळ एस., बेडग, डफळापूर, नागेवाडी, मांजर्डे, भिलवडी, कवलापूर, लेंगरे, दुधोंडी.

 Sangli ZP Election Latest News
पंकजांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या सुषमा अंधारे झाल्या उद्धव ठाकरेंसमोर भावूक!

अनुसचित जाती (एकूण जागा ८)

बहादूरवाडी, खरसुंडी, रांजणी, बुधगाव

महिला राखीव (४ जागा) ः शेगाव, देशिंग, वांगी, बोरगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग (एकूण जागा १८)

वाळवा, निंबवडे, दिघंची, कवठेपिरान, जाडरबोबलाद, सावळज, वाकुर्डे बुद्रुक, संख, कोकरूड.

महिला राखीव (९ जागा) ः बावची, एरंडोली, करजगी, सावंतपूर, चिकुर्डे, माडग्याळ, कुची, बिळूर, करंजे.

...यांचा पत्ता कट

संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे, सुहास बाबर, शिवाजी डोंगरे, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद अर्जुन पाटील, प्रमोद शेंडगे, सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, आशा पाटील, अरुण राजमाने, अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर.

...यांना संधी

माजी अध्यक्ष देवराज पाटील (कासेगाव), माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, सम्राट महाडिक (पेठ), शरद लाड (कुंडल), ब्रह्मनंद पडळकर (निंबवडे), तम्मनगौडा रवी-पाटील (जाडरबोबलाद), अमित पाटील (येळावी), विराज नाईक (मांगले), संभाजी कचरे, वैभव शिंदे (बागणी), रणधीर नाईक (पणुंब्रे तर्फ वारुण), डी. के.पाटील (चिंचणी), नितीन नवले (अंकलखोप), सतीश पवार (मणेराजुरी)

नव्या गटांचे आरक्षण

यावेळी एकूण आठ नवीन गट निर्माण झाले आहेत, तर पाच गटांची नावे बदलण्यात आली आहेत. तेथे पुढीलप्रमाणे आरक्षण आहे ः निंबवडे (नामाप्र), कवठेएकंद (नामाप्र), नांद्रे (सर्वसाधारण महिला), सांगाव (सर्वसाधारण महिला), करंजे (नामाप्र महिला), सावंतपूर (नामाप्र महिला), बहाद्दूरवाडी (अनुसूचित जाती), कुरळप (सर्वसाधारण), वाळेखिंडी (सर्वसाधारण), करजगी (नामाप्र महिला) माडग्याळ (नामाप्र महिला), हरिपूर ( सर्वसाधारण महिला), नेर्ले (सर्वसाधारण).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com