राज्यात हिंदुत्ववादी सरकार हे लक्षात ठेवा...

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दीपक बर्डे याचे प्रेमप्रकरणातून अपहरण झाले. या प्रकरणी आज श्रीरामपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला.
Nitesh Rane & Ashok Uike
Nitesh Rane & Ashok UikeSarkarnama

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) : श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दीपक बर्डे याचे प्रेमप्रकरणातून अपहरण झाले. या प्रकरणी आज श्रीरामपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ), माजी आदिवासीमंत्री अशोक उईके सहभागी झाले होते. या प्रसंगी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली.

नितेश राणे म्हणाले, पोलीस यंत्रणांकडून हिंदू संघटनांच्या विरोधात काम सुरू आहे. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावे की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नाही. तसेच अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ नाही अन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेही नाहीत. आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असून कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडवणीस हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत. त्यामुळे हे सुरू असलेले धर्मांतराचे लोन थांबले पाहिजे. यापुढे अशा कोणत्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाहीत, जोपर्यंत दीपक सापडणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील हिंदू तांडव करेल, असा स्पष्ट इशारा आमदार नितेश राणे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला.

Nitesh Rane & Ashok Uike
श्रीरामपूरच्या धर्मांतर प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा : नितेश राणे, अजित पवारांची मागणी

ते पुढे म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दीपक बर्डे याचे प्रेमप्रकरणातून अपहरण होऊन अनेक दिवस उलटूनही पोलिसांना त्याला शोधण्यात अपयश आले. त्याचा लवकर तपास लागला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी. तसेच मुलींवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी पाठीशी घातल्यास त्यांना सोडणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

Nitesh Rane & Ashok Uike
`नितेश राणे हे पालकमंत्री बनणार! म्हणूनच...`

भोकर येथील दीपक रावसाहेब बर्डे (वय 31) याचे गावातील 19 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर 30 ऑगस्टला तो पुणे येथे कामानिमित्त गेला होता. 31 ऑगस्टला मुलगा आपल्या मित्रासह सकाळी 11 वाजता नाश्ता करून येत असताना मुलीच्या नातेवाईकांनी अपहरण करून त्याला मारहाण केली. तेंव्हापासून मुलगा गायब असल्याची फिर्याद त्याचे वडील रावसाहेब बर्डे यांनी श्रीरामपूर पोलिसांत दिली होती. त्यावर तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी तपासाची चक्रे फिरवीत आज अखेर इमरान शेख, मजनू शेख, समीर शेख, अजीज शेख, राजू बबन शेख व अन्य दोन अशा सात जणांना अटक केली आहे.

या सर्वांना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. दीपकचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच श्रीरामपुरात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचार व धर्मांतराच्या वाढत्या घटनांना आळा बसवावा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आमदार राणे व माजी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Nitesh Rane & Ashok Uike
विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्रा. डॉ. अशोक उईके

यावेळी आमदार राणे यांनी पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आगपाखड केली. वरिष्ठ अधिकारी स्थानिक पोलीस निरीक्षकांना पाठीशी घालून आजाराचे कारण देत रजेवर पाठवतात असल्याचा आक्षेप नोंदविला. पोलिसांनी ठरवले तर दोन तासात सर्व माहिती मिळवू शकतात हे मला चांगले माहीत आहे. आमच्या घरात मुख्यमंत्री पद होते हे विसरू नका.

आमच्या समाजाच्या मुलींचे किंवा मुलांचे अपहरण झाले तर त्याचा पोलिसांना शोध लागत नाही. दुसऱ्या समाजाच्या बाबतीत झाले तर त्याचा पटकन शोध लागतो. मग पोलीस ठराविक समाजाला पाठीशी घालतात असा आरोप करून ते म्हणाले, दिपक याने पोलिसांत येऊन आपल्या जीवाला धोका आहे हे सांगितले होते. त्याच्या तक्रारीची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपींना मदत केली असा संशय असून त्यांची वरिष्ठ पाळीवरून चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास योग्य रितीने व वेगवान पद्धतीने सुरू आहे. दीपकचा घातपात करून त्याला गोदावरी नदीत फेकले असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्या दिशेने गोदावरी नदीच्या दोन्हीही बाजूने कसून शोध घेत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपअधीक्षक मिटके यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in