हरभऱ्याच्या किमान आधारभूत किमतीसाठी पणन मंत्र्यांनी घेतली बैठक : अधिकाऱ्यांना दिल्या या सूचना

हरभरा खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठक आज राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ( Balasaheb Patil ) यांनी घेतली.
Balasaheb Patil
Balasaheb Patilsarkarnama

मुंबई – मंत्रालयात हंगाम 2021-22 मधील हरभरा खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठक आज राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ( Balasaheb Patil ) यांनी घेतली. यावेळी त्यांनी आतापर्यंत चना खरेदी संदर्भातील आढावा घेतला व शेतकऱ्यांसाठी नोंदणीची तारीख वाढवावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ( Registration by May 17 for purchase of gram at minimum base price )

या बैठकीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, पणनचे सहसंचालक विनायक कोकरे, द विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, महाफपीसी पुणेचे योगेश थोरात यांच्यासह पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भाग्यश्री टिळेकर, विदर्भ ॲग्रीकल्चरल अलाईड प्रोड्युसर कंपनी (वॅपको) नागपूरच नाफेडचे पुनीतसिंग, भारतीय अन्न महामंडळ अंशुमन चक्रवर्ती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Balasaheb Patil
बाळासाहेब पाटील कराडकरांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

बाळासाहेब पाटील म्हणाले की, किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत 4 लाख 94 हजार 399 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आज तागायत 50.84 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी 17 मे पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

मंत्री पाटील पुढे म्हणाले की, चालू वर्षी राज्यात हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तथापि बाजारभाव मात्र हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी आणि राज्याल दिलेले हरभरा खरेदीचे उद्दिष्ट 6.89 लाख मे टन पूर्ण करण्यासाठी सर्व राज्य नाफेड संस्थानी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे खरेदी केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करावे. खरेदी केलेले शेतमाल गोदामात लवकर जमा करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात यावेत.यासाठी व्यवस्थापकीय संचालक, पणन महासंघ मुंबई यांनी नाफेड व भारतीय अन्न महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, शेतकरी चुकाऱ्यांबरोबर हमालीचे पैसे अनुषंगिक खर्च व बारदाण्याचे पैसेही नाफेडने लवकर अदा करावे. राज्यातील चना खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनची उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत, अश्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या.

Balasaheb Patil
बाळासाहेब पाटलांना अजित पवार, वळसे पाटील यांच्या रांगेत बसायचंय....

हरभरा 5230 प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत असून, 1 मार्च पासून 730 खरेदी केंद्रांवर हरभरा (चना) खरेदी सुरू करण्यात आला आहे. आजतागायत 4 लाख 94 हजार 399 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 50.84 लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. 2 लाख 80 हजार 284 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत 2658.93 कोटी असून, 1958.40 कोटी निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com