श्रीगोंद्यात काँग्रेसमध्ये बंड : गणेश भोस ठरणार एकनाथ शिंदे

विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी कालच्या सभेत पालिकेच्या कारभारावर थेट टिकास्त्र सोडले.
Manohar Pote & Ganesh Bhos
Manohar Pote & Ganesh BhosSarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) : विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी कालच्या सभेत पालिकेच्या कारभारावर थेट टिकास्त्र सोडले आणि आज पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील बंडाळी समोर आली. काँग्रेसचे गटनेते व नगराध्यक्षपती मनोहर पोटे यांच्याबद्दलची सत्ताधारी नगरसेवकांची नाराजी उघड झाली असून उद्या सोमवारी ते पोटे यांच्याविरुध्द काँग्रेस गटनेता बदलासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करणार असून त्यांच्यासोबत त्यासाठी बहुमत असल्याचा दावा करण्यात आला.

Manohar Pote & Ganesh Bhos
Ajit Pawar : 'निवडणुकीनंतर कळेल कोणाची शिवसेना खरी'

अजित पवार यांनी शहरातील रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली होती. भाषणात जाहीरपणे वक्तव्य केल्याने मोठी चर्चा झाली होती. पालिकेत बहुमत विरोधी भाजपाचे असले तरी नगराध्यक्ष मात्र काँग्रेसच्या शुभांगी पोटे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्यांची एकत्र गटनोंदणी झालेली असून नगराध्यक्षपती व नगरसेवक मनोहर पोटे हे गटनेते आहेत. मात्र पोटे यांच्याविरुध्द सत्ताधाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी नाराजी आहे. सभागृहात विश्वासात घेत नाहीत, विकासकामांबद्दल माहिती न देता थेट कामांचे वाटप होते, प्रभागातील कामेही माहिती होत नाहीत, भाजपच्या नगरसेवकांनाच जास्त जवळ करतात आदी आरोप करीत काँग्रेसच्या नगरसवेकांनी आता गटनेते पोटे हटाव मोहिम सुरु केली आहे. कालच्या अजित पवार यांच्या टिकेने ही नाराजी उघड झाली.

Manohar Pote & Ganesh Bhos
Ajit Pawar : स्वबळावर लढा पण विरोधकांना फायदा नको

बंडाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांचे पुत्र गणेश भोस यांच्या हाती आहे. याबाबत त्यांनी थेट काही न सांगता उद्या याबाबत माध्यमांकडे पुरावे देवू एवढेच सांगितले. दरम्यान नगरसेवीका सीमा गोरे यांचे पती प्रशांत गोरे यांनी मात्र गटनेता बदलला दुजोरा दिला. ते म्हणाले, यासाठी एक नव्हे अनेक कारणे आहेत. प्रभागात पुन्हा निवडणूक करताना काय उत्तरे द्यायची असा प्रश्नही त्यांनी केला. शिवाय गटनेते असणारे पोटे कधीही काँग्रेसला सोडून भाजपात जावू शकतात त्यावेळी आमची अडचण होवू नये म्हणून आम्ही गटनेता बदलत असून आमच्या सोबत पाच नगरसेवकांचे बहुमत आहे.

Manohar Pote & Ganesh Bhos
श्रीगोंद्यात नाहाटांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहुर्त ठरला : इतरांचे विखेपाटील प्रेम आडवे येणार?

काँग्रेसचे जे कोणी नाराज आहेत त्यांच्या प्रभागात निधी दिलेला आहे. जी कामे रखडली आहेत ती कशामुळे थांबलीत व ही नाराजी का आहे याचेही खरे उत्तर योग्य वेळ आल्यावर देवू.

- शुभांगी पोटे, नगराध्यक्ष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com