बंडखोर आमदारांचे पांडुरंगाला साकडे : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनेच लागू दे!

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले ( Bharat Gogawale ) यांनी न्यायालयाचा उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागो असे साकडे बंडखोर आमदारांनी पांडुरंगाला घातले असल्याचे सांगितले.
Eknath Shinde News, Shivsena News, Uddhav Thackeray Latest Marathi News
Eknath Shinde News, Shivsena News, Uddhav Thackeray Latest Marathi NewsSarkarnama

पंढरपूर - राज्यातील खरी शिवसेना कोणती याचा निकाल उद्या (सोमवारी) सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आषाढी एकादशी निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. यावेळी शिंदे गटातील सर्व आमदारांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. भाजपचे काही नेतेही दोन दिवसांपासून पंढरपूरमध्ये होते. आषाढी एकादशीला राज्यातील एवढे नेते एकाच वेळी पंढरपूरला दाखल होण्याची बहूदा पहिलीच वेळ आहे. या निमित्त माजी मंत्री तथा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले ( Bharat Gogawale ) यांनी न्यायालयाचा उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागो असे साकडे बंडखोर आमदारांनी पांडुरंगाला घातले असल्याचे सांगितले. Shivsena News Update

दादा भुसे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याची प्रगती होवो. गोरगरीब, दीन दुबळ्यांना न्याय मिळो, शेतकरी-शेतमजूर सर्वांची प्रगती होवो, सर्व आनंदी होवो अशी प्रार्थना पांडुरंग चरणी केली आहे.

Eknath Shinde News, Shivsena News, Uddhav Thackeray Latest Marathi News
एकनाथ शिंदे गटाचे पंढरपुरात शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी

संजय राठोड म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी सुख, समृद्धी भरभराट होवो. राज्यातील प्रत्येक घरात आनंद नांदो अशी प्रार्थना केली. तीच प्रार्थना आम्ही सर्व आमदारांनी पांडुरंगाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

भरत गोगावले यांनी सांगितले की, आम्ही सर्व आमदार भाग्यवंत आहोत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला येथपर्यंत आणले. त्यांच्या पूजेच्या मानाबरोबरच आम्हालाही दर्शन मिळाले. उद्याच्या न्यायालय सुनावणीनंतर सर्व सुरळीत होईल. न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागणार. पांडुरंगाला साकडे घाडूनच आम्ही जनतेच्या सेवेसाठी चाललो आहोत.

गोगावले पुढे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शंभर टक्के आहोत. एक टक्काही कमी करण्याचे काही कारण नाही. आम्ही जे उतरलोय ते पूर्ण ताकदीनिशी उतरलो आहेत. आम्ही रस्त्यावरील लढाई लढणारेच लोक आहोत. ते आम्हाला नवीन नाही. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही मूळचे शिवसैनिकच आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde News, Shivsena News, Uddhav Thackeray Latest Marathi News
video: भरतशेठ गोगावले यांची रोखठोक भूमिका

उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलेल्या आवाहनावर त्यांनी सांगितले की, आम्ही सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविला आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधिल आहोत, असे स्पष्ट केले तसेच खासदार संजय राऊतांविषयी त्यांनी सांगितले की, ते मोठे आहेत. त्यांना बोलण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र त्यांनी ते अधिकार जसे वापरायला हवे तसे न वापरता चुकीच्या पद्धतीने वापरले. त्याच्यामुळे हा परिणाम झाला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मंत्रीमंडळात मिळालेल्या संधीचे आम्ही सोने करणार. ही सर्व माणसे सोन्यासारखी आहेत. दादा भुसेंचे केस पहा सोन्यासारखे आहेत. काळजी करण्याचे कारण नाही, असे गोगावले यांनी सांगताच दादा भुसे म्हणाले, शिवसैनिक हा कधीही अपेक्षेने काम करत नसतो. प्रमुख जी जबाबदारी देतील ती पारपाडायची असते, असे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde News, Shivsena News, Uddhav Thackeray Latest Marathi News
शिवसेना अन् शिंदे गटाच्या भांडणात आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचणार; 53 आमदारांना नोटीस

पांडुरंगाच्या आशीर्वादाने सर्व ओके होणार

शहाजी पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी यशस्वी व्हावी. पांडुरंगाच्या आशीर्वादाने पुढचे राज्यातील सर्व राजकारण ओके होणार आहे. शिवसेनेतील राजकीय घडामोडीला केवळ संजय राऊतच नव्हेत तर अनेक बाबी जबाबदार आहेत. हे दुःख एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतले. त्यामुळे हा उठाव यशस्वी झाला. मरे पर्यंत एकनाथ शिंदे हेच आमचे नेते राहणार, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in