Amit Shah : खरी शिवसेना आता भाजपसोबत, 'त्यांना' धडा शिकवला; शाहंचा हल्लाबोल !

Amit Shah : धनुष्यबाण गहाण ठेवला होता, तो भाजपसोबत आला..
Amit Shah Kolhapur
Amit Shah KolhapurSarkarnama

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल पुण्यातल्या दौऱ्यानंतर आता कोल्हापूरमध्ये पोहचले आहेत. कोल्हापूरमध्ये आयोजित सभेत शाह यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा मोदींच्या झोळीत टाकण्याचं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ही जोरदार टीका केली.

अमित शाह म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवला होता. धनुष्यबाण काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो पुन्हा आता धनुष्यासह भाजपसोबत आला आहे."

Amit Shah Kolhapur
Uddhav Thackeray : राज्यातील कायदेतज्ञांची ठाकरेंनी मातोश्रीवर घेतली बैठक; पुढील रणनीती तयार?

शाहपुढे म्हणाले, आता सगळ्या अडचणी दूर झाले. 2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाम्ध्ये आपण निवडणुकांना सामोरे गेलो होतो. त्यावेळी मोठा फोटो मोदींचा होता, तर छोटा फोटो उद्धव ठाकरे यांचा होता. पण निकालानंतर यांच्या तोंडाला पाणी सुटलं, ठाकरे हे सर्व सिद्धांत सोडून, शरद पवारांच्या चरणाशी गेले, असे शाह म्हणाले.

Amit Shah Kolhapur
Shivsena News : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण गमावल्यांनतर ठाकरे ॲक्शन मोडवर; मोठे राजकीय पाऊल उचलले

"भाजपला सत्तेचा मोह कधीच नाही. आमच्यासाठी महाराष्ट्राचं हित सर्वोतोपरी राहिले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात काम भाजपच्याच जास्त असलेल्या आमदारांनी केले आहे. आज त्यांना (उद्धव ठाकरेंना) धडा देखील शिकवण्याचे काम केले आहे.

शाह म्हणाले, महाराष्ट्रात केवळ आम्हाला बहुमत नको आहे. गेल्या निवडणुकीत ४८ पैकी २२ जागा जिंकल्या, मात्र यावर आम्ही समाधानी नाही. यावेळी बहुमत नाही तर संपूर्ण विजय हवा आहे. सर्वच्या सर्व 48 जागा भाजपच्या झोळीत टाका, मोदींच्या झोळीत टाका, असे शहा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in