Ravindra Dhangekar News : नाना पहिल्यांदा भेटले तेव्हाच म्हणाले, तू आमदार व्हायचं ; धंगेकरांनी सांगितली आठवण!

Nana Patole News : "निवडणुकीत फक्त पंतप्रधान मोदीच यायचे बाकी होते.."
Ravindra Dhangekar News :
Ravindra Dhangekar News : Sarkarnama

Ravindra Dhangekar News : कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार व महाविकास आघाडीचे नेते रविंद्र धंगेकर यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित केले गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सांगोल्यात भव्य सत्काराचा कार्यक्रम पार पडला. लोणारी समाजातर्फे या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Ravindra Dhangekar News :
Pune News : चंद्रकांतदादा आले अन् अजितदादांचे व्यंगचित्र शोधू लागले; दादांची भन्नाट मिश्किली..

यावेळी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले, "आता मी निवडणूक लढवून दोन महिने पूर्ण होत आहेत. समाजातील सगळ्या स्तरातील लोक मला बोलावतात आणि माझा सत्कार करतात. मी नाना पटोले (Nana Patole) यांना माझी पहिल्यांदा ओळख करून दिल्यानंतर, तेव्हाच त्यांनी मला म्हंटलं की, 'तू नगरसेवक नाही, आमदार व्हायचं आहे,' त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला आणि मला विधानसभेत जाण्याची संधी दिली," अशी आठवण धंगेकरांनी सांगितली.

धंगेकर पुढे म्हणाले, "माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी शरद पवार साहेबांना भेटायला गेलो. आपल्या समाजाची माहिती त्यांना होती. त्यांनी स्वतः माझ्यासाठी पुण्यात सभा घेतल्या. कसबा निवडणुकीच्या वेळी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यायचे राहिले होते, बाकी सगळे लोकं तिथे आले होते. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, पण त्यांना सगळ्यांना आपण परत पाठवलं. "

Ravindra Dhangekar News :
Murlidhar Mohol News : पुण्यातील विकास प्रकल्पांचा 'कांजूरमार्ग' होऊ देणार नाही! मोहोळांचा आदित्य ठाकरेंना इशारा

नाना पटोलेंचं गणपतराव देशमुख यांना अभिवादन :

या कार्यक्रमात भाषणाच्या सुरुवातीला नाना पटोले यांनी दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांना अभिवादन केले. सांगोला मधील लोकं किती चांगली आहेत, हे गणपतराव यांच्यामुळे कळत होतं, पण आता मात्र कळत नाही. मला आठवत आहे की, कसबा आणि चिंचवड ची जेव्हा पोटनिवडणूक लागली. पुण्यात मोठे मोठे नेते आहे त्यातून सर्व सामान्य माणसाला निवडणे अवघड होतं, एक सर्व्हे केला आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangeker) यांचे नाव समोर आले, असे नाना पटोले म्हणाले.

"रवी ने मला त्याच्याकडे जेवायला बोलावले आणि तेव्हा मला कळले की, हा परिवार समाज सेवा करायला तयार आहे. म्हणून मी त्याला सांगितलं की नगरसेवक नाही, आमदार म्हणून निवडून यायचं आहे," अशी आठवण नाना पटोलेंनी सांगितली.

(BY - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com