Sanjay Raut News : राऊतांची वाचाळ बडबड; खासदारकीचा राजीनामा देवून ग्रामपंचायत निवडून दाखवा

Shambhuraj Desai : शंभुराज देसाईंचे संजय राऊतांना आव्हान
Sanjay Raut, Shambhuraj Desai
Sanjay Raut, Shambhuraj DesaiSarkarnama

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या नादाला लागल्यामुळेच त्यांचे ४० आमदार दूर गेले. उर्वरीत १५ आमदार त्यांना दूर घालवायचे नसतील तर ठाकरे यांनी राऊत यांच्यापासून सुरक्षीत अंतर ठेवावे. राऊत हे आमच्या मेहबानीवर खासदार झाले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देवून एखाद्या ग्रामपंचायतीच्या, पालिकेच्या वार्डातून निवडून येवून दाखवावे, असे थेट आव्हान उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी खासदार राऊत यांना दिले.

पालकमंत्री देसाई (Shambhuraj Desai) आज कऱ्हाड (जि. सातारा) येथील विश्रामगृहात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, "वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळेच मला मंत्रीपद मिळाले आहे, हे राऊत यांचे वस्तव्य खरे आहे. आजही बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करुन आम्ही कामकाज करतो. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे आमचेच आहेत, असे म्हणू नये."

Sanjay Raut, Shambhuraj Desai
Imtiaz Jalil News : आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कुणीतरी औरंगजेबाचे फोटो देवून तरुणांना घुसवले..

यावेळी देसाई यांनी राऊत यांना ग्रामपंचायत निवडून दाखला असे थेट आव्हान केले. ते म्हणाले, "उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत यांच्या नादाला लागू नये. त्यामुळे त्यांचे ४० आमदार दूर गेले. उर्वरीत १५ आमदार दूर जावू वाटत नसेल तर त्यांनी राऊत यांच्यापासून सुरक्षीत अंतर ठेवुन रहावे. राऊत हे आमच्या मेहबानीवर खासदार झाले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्याव. त्यानंतर एखाद्या ग्रामपंचायतीच्या, पालिकेच्या वार्डातून निवडून येवून दाखवावे."

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (ECI), विधीमंडळातील सदस्यांवर केलेल्या टीकेचाही देसाई यांनी समाचार घेतला.

देसाई म्हणाले, "राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातही त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबाबत असंसदीय शब्द वापरला आहे. त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या विधीमंडळात उमटले. सर्व बाजुच्या सदस्यांची राऊत यांच्या असंसदीय खालच्या स्तरावर केलेल्या वक्तव्याबद्दल अत्यंत तीव्र भावना आहेत."

यावेळी देसाई यांनी हक्कभंग समितीबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "विधानंडळाच्या हक्कभंग समितीची पहिली बैठक झाली. त्या समितीने त्यांना नोटीस बजावली आहे. त्याची मुदत काल सायंकाळी साडेसहापर्यंत होती. त्यामुदतीत त्यांनी उत्तर दिलेले नाही."

Sanjay Raut, Shambhuraj Desai
Balasaheb Thorat : जिरवाजिरवी करू नका, एक दिवस तुमचीच चांगली जिरेल ; थोरातांचा विखेंना इशारा!

राऊत वाचाळ बडबड करतात असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे. ते म्हणाले, "निवडणूक आयोगाची रचना घटनात्मक असून राष्ट्रपतींच्या मान्यतेने झालेली आहे. त्या आयोगाला घटनात्मक अधिकार आहेत. त्या आयोगाबाबतीतही असभ्य बोलणे निंदनीय आहे. निवडणूक आयोगाचे निकाल आमच्या चिन्हाबाबत, पक्षाबाबत आले त्यावेळीही राऊत यांनी न्यायालये तुम्ही खिशात घातले आहेत, असे व्यक्तव्य केले. राऊत हे राज्यात फिरुन वाचाळ बडबड करत आहेत."

आम्ही रस्त्यावर जरी जाता-जाता उभे राहिलो तरी तीन-चारशे लोक भेटतात. तेवढी लोकही साताऱ्याच्या सभेला त्यांचा नव्हती. राऊत यांच्या बेतावल वक्तव्याबाबत मी त्यांचा निषेध करतो. घटनात्मक अधिकार असणाऱ्या संस्थाबददल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. सर्वपक्षीय आमदारांनी अधिवेशन संपायच्या आत हक्कभंग समितीने त्यांचा अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे. केंद्राचे अधिवेशन ज्यावेळी सुरु होईल त्यावेळी लोकसभा, राज्यसभेतही त्याचे पडसाद उमटतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com