सांगोल्याचा उमेदवार अक्कासाहेब ठरवतील तोच असेल!

सांगोला तालुका शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो
Ganapatrao Deshmukh, Ratankaki Deshmukh
Ganapatrao Deshmukh, Ratankaki Deshmukhsarkarnama

सांगोला : शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या बैठकीसाठी शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख (Ganapatrao Deshmukh) यांच्या पत्नी रतनकाकी देशमुख प्रथमच राजकीय व्यासपीठावर आल्या. रतनाकाकी यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. रतनकाकीच्या राजकीय व्यासपीठावर येण्याने आबासाहेबांच्या वारसाबाबत स्थिरता येईल का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्यातच शेकापचे जेष्ठ आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या भाषणात 'अक्कासाहेब जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल' असे जाहीर केले.

Ganapatrao Deshmukh, Ratankaki Deshmukh
प्रभाग रचनेवरुन अजितदादांनी टोचले आघाडीच्या नेत्यांचे कान

सांगोला तालुका शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकच पक्ष, एकच मतदारसंघ यातच विक्रमी वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे पक्षामध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आबासाहेबांच्या वारसाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्या. शेतकरी कामगार पक्षाचे राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीचे दोन दिवसीय अधिवेशन सांगोल्यात संपन्न झाले. या अधिवेशनासाठी कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रतिसादामुळे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यातच या अधिवेशनावेळी रतनकाकी देशमुख प्रथमच राजकीय व्यासपीठावर आल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या व्यासपीठावर येण्याने तालुक्यात सुरू असणाऱ्या राजकीय वारसाबाबत सध्यातरी स्थिरता येईल का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Ganapatrao Deshmukh, Ratankaki Deshmukh
पंकजा मुंडेंना मोठा धक्का; समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आमदार जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जमिनीवर राहून कार्यकर्त्यांची सुसंवाद राखून काम करण्याच्या सूचना दिल्या. पद मिळाल्याने मी फार कोणीतरी मोठा असे पदाधिकाऱ्यांनी समजू नये. शेतकरी कामगार पक्षात तळागाळातील कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य आहे असेही त्यांनी सांगितले. सध्या आमच्या पक्षीय घरामध्ये विरोधकांनी डोकावू नये, असा ईशाराही त्यांनी विरोधकांना दिला. अक्कासाहेब (स्व. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी) ह्याच विधानसभेचा उमेदवार ठरवतील असे, जाहीर केले. या अधिवेशनामध्ये पाटील यांनी सर्व तालुक्याचे चिटणीस मंडळ बरखास्त केले आहे. नवे चिटणीस मंडळात तरुणांना संधी देईल, असेही यावेळी पाटील यांनी सांगितल्याने सांगोला तालुक्यांमध्ये कोणाला संधी मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com