वारकऱ्यांसाठी रावसाहेब दानवे झाले चहावाले...; पहा व्हिडीओ

Raosaheb Danve| Eknath Shinde| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.
Raosaheb Danve
Raosaheb Danve

पंढरपूर : दोन वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी पुर्वीच्याच जल्लोषात आषाढी वारी सोहळा दिमाखात पार पडत आहे. एकादशीनिमित्त लाखो वारकरी भाविक आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. ऊन, पाऊस, लहरी हवामान कशीचीही पर्वा न करता, न थकता वेगवेगळ्या दिंडीमधून पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात दाखल झाले. एकदाशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेताना वारकऱ्यांचं मन भरुन पावतं. (Raosaheb Danave latest news)

विशेष म्हणजे, आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गावर अनेक लोक दमलेल्या वारकऱ्यांची सेवा करताना दिसतात. जालना जिह्यातील भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप गावातील सुभाष वाघ यांनी आषाढी एकादशीनिमीत्त फिरते चहाचे हॉटेल पंढरपूरमध्ये लावले आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात प्रत्येक विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी ते चहाची छोटीशी हॉटेल लावतात.

Raosaheb Danve
Congress : गोव्यात एकनाथ शिंदे पॅटर्नच्या चर्चेनं खळबळ; काँग्रेसची 'शिवसेना' होणार?

आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या चहाच्या हॉटेलवर जाऊन स्वतःच्या हातांनी चहा बनवत पंढरपूरच्या वारीत आलेल्या भाविकांना वाटप केला. आपल्या मतदार संघातील सर्व भाविकांची विचारपूस करत त्यांनी भेटी ही घेतल्या. यावेळी आपल्या जिल्ह्याचा खाजदार स्वतःहा चहा वाटून विचारपूस करत असल्याने अनेकांन भाविकांनी त्यांना आशीर्वाद ही दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची महापुजा

आज पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. "महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाला साकडे घातले. राज्यातले सर्वच लोक सुखी आणि समृध्द होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यानी विठ्ठलाकडे केली. शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत महापूजा केली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले.

एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in