डिसले गुरुजींनी काळजी करू नये : शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन नरमले!

अमेरिकेला जाण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून मंजूर करून येत्या सोमवारपर्यंत तो राज्य सरकारला पाठविण्यात येईल.
Ranjit Singh Disale
Ranjit Singh DisaleSarkarnama

सोलापूर : रणजितसिंह डिसले (ranjitsinh disale) गुरुजींनी कुठलीही काळजी करू नये. त्यांना अमेरिकेत जाऊन पीएचडी करण्यासाठी सोलापूर (solapur) जिल्हा प्रशासनाची कोणतीही आडकाठी नाही. त्यांना अमेरिकेला जाण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून मंजूर करून येत्या सोमवारपर्यंत तो राज्य सरकारला पाठविण्यात येईल, अशी ग्वाही सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिली. (ranjitsinh disale Guruji's proposal for US to be sent to government by Monday : Dilip Swami)

ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाऊन पीएचडी करायची आहे. पण, त्यांना सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाकडून परवानगी मिळत नव्हती. त्यांनी कलेल्या अर्जात त्रूटी असल्याचे सांगून त्यांचा प्रस्ताव नाकारत त्यांना पुन्हा मुख्याध्यपकांकडे जाण्यास सांगितले होते. तसेच, त्यांच्यावर तीन वर्षांपासून कामावर हजर न राहता पगार घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे डिसले यांनी राजीनामा देण्याची व्यथा बोलून दाखवली होती. त्याची दखल खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांना डिसले यांचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने वरील भूमिका घेतली.

Ranjit Singh Disale
बाजार समितीच्या संचालकांसाठी 'गुड न्यूज' : तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा बोनस

स्वामी म्हणाले की, रणजितसिंह डिसले गुरुजींच्या संदर्भात विविध प्रसार माध्यमांतून आपण बातम्या पाहिल्या. कुठेतरी कम्युनिकेशन गॅपमधून हा प्रकार घडला आहे. त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी किंवा त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची कुठलीही आडकाठी नाही. शनिवार, रविवार असतानादेखील शिक्षण विभागाकडून त्यांचा प्रस्ताव तयार करून मंजूर करण्यात येईल आणि तो राज्य सरकारला सोमवारपर्यंत पाठविण्यात येईल.

Ranjit Singh Disale
निवडणूक लांबणीवर गेली अन्‌ शेकापचा घात झाला; दोन माजी नगराध्यक्षांचा पराभव

परदेशात जाण्यासाठी रितसर अर्ज द्यावा लागतो. परदेशातील स्कॉलरशिप प्राप्त करण्यासाठी, त्यासाठी विविध पारपत्रांमध्ये अर्ज द्यावा लागतो. अंडरटेकिंग द्यावे लागतात. काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, ती त्यांच्याकडून झाली नसल्यामुळे त्यांचा अर्ज प्रलंबित राहिला आहे. परंतु आता शनिवार, रविवार असतानादेखील संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे मिळवून डिसले गुरुजींना त्यांच्या स्कॉलरशिपसाठी जी काही परवानगी लागणार आहे. ती दिली जाईल. त्यांचा प्रस्ताव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

Ranjit Singh Disale
डिसले गुरुजी प्रकरणात शिक्षणमंत्र्यांची एंट्री! शिक्षण विभागाला तातडीनं दिला आदेश

आम्ही येत्या सोमवारपर्यंत डिसले गुरुजींना परवानगी प्रदान करणार आहोत, त्यामुळे डिसले गुरुजींनी कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. असं आपण त्यांना संगितले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com