रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

खासदार MP रणजितसिंह निंबाळकर Ranjitsinh Nimbalkar यांनी पहिल्या टप्प्यात माण- खटाव Maan-Khatav या विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना मंजूर करून घेतली आहे.
Ranjitsinh Nimbalkar
Ranjitsinh Nimbalkarsarkarnama

दहिवडी : माण-खटाव तालुक्यातील १८१ गावांसाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत तब्बल ५६ कोटी ८३ लाख ६२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या गावांतील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपणार आहे, असा विश्वास जलजीवन मिशनच्या केंद्रीय समितीचे सदस्य खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार ‘केंद्रीय जल जीवन मिशन’अंतर्गत घरोघरी पाणी ही केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना देशभरात वेगाने सुरू आहे. खासदार रणजितसिंह यांनी पहिल्या टप्प्यात माण- खटाव या विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना मंजूर करून घेतली आहे. माणमधील १०४ व खटावमधील ७७ अशा मतदारसंघातील एकूण १८१ गावांना या योजनेचा लाभ मिळेल.

Ranjitsinh Nimbalkar
महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला लागलेला शाप : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर 

माणसाठी २३ कोटी २ लाख ६५ हजार, तर खटावसाठी ३३ कोटी ८० लाख ९७ हजार असा एकत्रित ५६ कोटी ८३ लाख ६२ हजार रुपये निधी त्यांनी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे माण व खटावमधील एकूण १८१ गावांना नळ जोडणीद्वारे घरोघरी पाणीपुरवठा होईल. राज्य शासन व जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामाची कार्यवाही होईल.

Ranjitsinh Nimbalkar
फलटण तालुका "राजेमुक्त' करा : रणजितसिंह निंबाळकर

या योजनेसाठी माण-खटावमध्ये कोणत्याही कालव्यातून पाणी उपलब्ध होत नसून पाणी स्त्रोत उपलब्ध सुविधेनुसार केला जाणार आहे. या योजनेंतर्गत काही गावांची कामे पूर्ण झाली असून, काही गावांची कामे प्रगतिपथावर आहेत. केंद्र शासनाची ही योजना देशभरात २०२४ पर्यंत सुरू राहणार असली तरीही अगदी प्राथमिक स्तरावर गरजू विधानसभा मतदारसंघासाठी खासदारांनी ही योजना मंजूर करून घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com